fbpx
Tuesday, September 26, 2023
BusinessLatest News

मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

 २०२१, २०२२ आणि २०२३ आर्थिक वर्षातील महसूलानुसार भारतातील सर्वात मोठी हेल्थ बेनिफिट्स ऍडमिनिस्ट्रेटर कंपनी, मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेड या बंगलोर-स्थित कंपनीने बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केले आहे.

दर्शनी मूल्य प्रत्येकी ५ रुपये असलेल्या २८,०२८, १६८ इक्विटी समभागांच्या (२.८० कोटी किंवा २८.०३ मिलियन इक्विटी समभाग) विक्रीतून भांडवल उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे.

एफअँडएस रिपोर्टनुसार २०२२ आर्थिक वर्षामध्ये हेल्थ बेनिफिट्स ऍडमिनिस्ट्रेटर्सकडून सेवा पुरवल्या जाणाऱ्या रिटेल आणि ग्रुप (दोन्ही एकत्रित) सेगमेंटमधील ३३.६७% हिस्सेदारी, ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स मार्केटमधील ४१.७१% हिस्सेदारी आणि रिटेल हेल्थ इन्श्युरन्स मार्केटमधील १४.८३% हिस्सेदारीसह, रिटेल आणि ग्रुप पॉलिसीजसाठी व्यवस्थापनांतर्गत असलेल्या प्रीमियमच्या संदर्भात ही कंपनी भारतातील सर्वात मोठी हेल्थ बेनिफिट्स ऍडमिनिस्ट्रेटर आहे.

समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये डॉ विक्रम जीत सिंग छटवाल यांच्याकडून २५३९०९२ पर्यंत; मेडीमॅटर हेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून १२४६८५९२ पर्यंत; बेसेमेर हेल्थ कॅपिटल एलएलसीकडून ६६०६०८४ पर्यंत (“समभागांची विक्री करू इच्छिणारा प्रमोटर ग्रुप”), इन्व्हेस्टकॉर्प प्रायव्हेट इक्विटी फंड I कडून ६२७५७०६ पर्यंत (“समभागांची विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार”), विवेक पंडित यांच्याकडून २६३८२ पर्यंत, राहुल एम खन्ना यांच्याकडून २२६१३ पर्यंत, शंकर राव पलेपु (पलेपु नीना राव यांच्यासह) यांच्याकडून १७३३७ पर्यंत, प्रमोद मनोहर अहुजा यांच्याकडून (ज्योती अहुजा यांच्यासह) १७३३७ पर्यंत, केशव संघी (विनिता केशव संघी यांच्यासह) यांच्याकडून १७३३७ पर्यंत, अमितकुमार गजेंद्रकुमार पटनी यांच्याकडून (रुची अमितकुमार पटनी यांच्यासह) १३५६८ पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे इतर) इक्विटी समभागांचा समावेश आहे. (विक्रीसाठी ऑफर)

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (आधीची एडेलवीज सिक्युरिटीज लिमिटेड), एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मार्फत विक्रीसाठी प्रस्तुत केले जाणारे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: