पुढील वर्षी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी – चंद्रकांत पाटील
पुणे – पुढील वर्षी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास राज्याचे उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
‘सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन’च्या ‘ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्’च्या दहाव्या स्थापना दिन आणि पदवीप्रदान समारंभात उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते.
केसरकर यांच्या हस्ते आर्किटेक्चर आणि इंटीरिअर डिझाइनच्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
फाउंडेशनच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, संचालिका डॉ. पूजा मिसाळ, करण मिसाळ, मानसी देशपांडे, मनोज देशपांडे, प्राचार्या डॉ. पूर्वा केसकर, उपप्राचार्या मनाली देशमुख, इंटेरियर विभाग प्रमुख मयुरेश शिरोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात राज्यातील 1500 महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. पुढील वर्षी राज्यातील सर्व 42 विद्यापीठांतील पाच हजार महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.
केसरकर म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. जगाच्या गरजा लक्षात घेऊन विकास केला जात आहे. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. आता आपण पदवी घेत असताना आवडणाऱ्या अन्य शाखेच्या विषयाचा अभ्यास करू शकतो. भाषा, इतिहास, परंपरेचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचा अभिमान बाळगा.
आमदार मिसाळ म्हणाल्या, आर्किटेक्चर आणि इंटीरिअर डिझाइनच्या शिक्षणाबरोबर उत्तम व्यक्ती म्हणून ब्रिकमध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण होत आहे. प्रकल्प व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी अक्षिता साठे, भूमिका गायके, अभिजीत लांडगे, सीमा खान, गौरी ठाणगे