fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRA

हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी घेतली अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट

औरंगाबाद – ख्यातनाम हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आज अन्न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली.

धनराज पिल्ले हे औरंगाबाद येथे आले होते. त्यावेळी ही भेट झाली. श्री. भुजबळ यांनी धनराज पिल्ले यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोघा मान्यवरांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. धनराज पिल्ले हे भारतीय हॉकी संघाचे कप्तान होते व चार वेळा ऑलिम्पिक, चार वेळा हॉकी विश्व कप, चार वेळा हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि चार वेळा एशियाड स्पर्धांमध्ये खेळणारे ते एकमेव खेळाडू आहेत. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: