fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

माझा आणि निशिगंधाचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे: दक्षता जोएल

सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?

–  ह्या मालिके बद्दल सांगायचं झालं तर ही सख्या बहणींच्या नात्यांमधली खूप सुंदर गोष्ट आहे. ही मालिका प्रेक्षकांनी पाहिल्यावर त्यांना फक्त जवळचेच नातेवाईक आठवतील असे नाही तर दूर असलेल्या आणि संपर्कात नसलेल्या त्यांच्या प्रियजनांचीही त्यांना आठवण येईल. ही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटेल कारण ह्यात एकदम साधारण कुटुंबाचं आयुष्य दाखवले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारी असणार आहे.

निशिगंधा या तुझ्या भूमिकेबद्दल/पात्राबद्दल काय सांगशील?

–  मी निशिगंधाची भूमिका साकारत आहे. निशिगंधा खूप साधी आणि लाजाळू स्वभावाची मुलगी आहे. पण दक्षता वास्तविक जीवनात खूप  चुणचुणीत आणि नटखट आहे. रघुनाथराव तिचे वडील असून त्यांचा धाक आहे कारण ते खूप परंपरानिष्ठ आहेत. तुम्ही मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की रघुनाथराव अजूनही टेलिफोन वापरतात आणि ते स्वदेशीचे पुरस्कर्ते आहेत, तरीपण त्यांचा विकासाला विरोध नाही. त्यामुळे निशिगंधा मुळातच खूप शिस्तप्रिय आहे, हे तिच्या व्यक्तिरेखेत तुम्हाला दिसेल. व तिला आनंद झाला तरी तिच्या डोळ्यात पाणी येत आणि दुःखी असली तरी डोळ्यात पाणी येत. निशिगंधा खूप हळव्या स्वभावाची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती उत्तम बॅडमिंटनपटू आहे हे तुम्हाला मालिकेच्या येणाऱ्या भागांमधून दिसेलच.

 

तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?

–    सर्वप्रथम या मालिकेतील स्टार कास्ट खूप कमाल आहे. अशोक शिंदे सर, खुशभु तावडे आणि शर्मिष्ठा ताई आणि रुची म्हणजेच ओवी जी माझ्या बहिणीचा रोल करतेय. या सार्वांबरोबर काम करायला दडपण वाटत होत पण त्यांच्या सोबत आता काम करताना खूप खूप मज्जा येते. सारं काही तिच्यासाठी मालिकेची सर्व टीम खूप छान आहे. सेटवरच वातावरण सुद्धा खूप सुंदर असते.

तेव्हा पाहायला विसरू नका “सारं काही तिच्यासाठी” सोमवार ते शनिवार संध्या.  ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d