fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

लेक्ट्रिक्स ईव्हीने लिमिटेड एडिशन ‘एलएक्सएस मूनशाईन’ लॉन्च केली

मुंबई : भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षांमधील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा यशस्वी झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ लेक्ट्रिक्स ईव्ही एक स्पेशल-एडिशन ईव्ही स्कुटर लॉन्च करत आहे. या स्पेशल एडिशन स्कुटरची फक्त काही मर्यादित युनिट्सच बनवली जातील. चंद्रयान३ लॉन्चच्या वेळीच मूनशाईन लॉन्चचा काउन्टडाऊन सुरु करण्यात आला होता. जेव्हा ‘विक्रम’ ने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याच क्षणी लेक्ट्रिक्स मूनशाईनचे उदघाटन करण्यात आले.

अंतराळ क्षेत्रात भारत वेगाने प्रगती घडवून आणत आहे, त्याचे प्रतीक म्हणून आकाशाची दिशा दर्शवणारे दोन बाण हे सोनेरी चिन्ह लेक्ट्रिक्स मूनशाईनवर अतिशय अभिमानपूर्वक लावले गेले आहे. हे ‘स्पेस एज’ चिन्ह खरेतर लेक्ट्रिक्सच्या ब्रँड लोगोमध्ये बदल करून तयार करण्यात आले आहे.

स्पेशल एडिशन लॉन्चबद्दल लेक्ट्रिक्स ईव्हीचे एमडी आणि सीईओ श्री. के विजय कुमार यांनी सांगितले, “आजच्या भारतीय जेन झेडच्या महत्त्वाकांक्षांना आकाश देखील अपुरे पडेल. त्यांची स्वप्ने चंद्राकडे झेपावत आहेत. महत्त्वाकांक्षांचे बळ आणि सुयोग्य तंत्रज्ञान हाताशी असेल तर तुम्ही किती दूरवर मजल मारू शकता हे भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेने दाखवून दिले आहे. लेक्ट्रिक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांची व्यक्तिगत उद्दिष्ट्ये निश्चित करून ती पूर्ण रण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रोत्साहित करतो. मूनशाईनबद्दल मला स्वतःला खूप उत्सुकता आहे. हे करत असताना आमच्या मनात भारताच्या अंतराळ युगातील कामगिरीबद्दल ठाम विश्वास आहे. प्रत्येकाने हा ऐतिहासिक क्षण लक्षात ठेवावा आणि त्याचा आनंद साजरा करावा यासाठी हे केले जात आहे.”

ईएफजीएच ब्रँड इनोव्हेशन्सचे संस्थापक आणि क्रिएटिव्ह चेअरमन श्री इमॅन्युएल उप्पूतुरू यांनी सांगितले, “ही काही मार्केटिंगपुरती करण्यात आलेली आणखी एक सोशल पोस्ट नाही. ग्राहकांना ज्याविषयी खूप अभिमान वाटेल असे उत्पादन सादर करून हा महत्त्वाचा क्षण साजरा करण्याची संधी प्रदान करण्यासाठी आम्ही हे करत आहोत. म्हणूनच आम्ही एलएक्सएस मूनशाईनसाठी एक विशेष लूक तयार केला आहे, ज्यामध्ये एक विशेष बॅज देखील आहे. एलएक्सएसची राईड हा जणू अभिमानास्पद पदक मिळवल्यासारखा अनुभव आहे.”

Leave a Reply

%d