जुन्नर ते नारायणगाव 15 किमी ग्रीन हायवे अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा 15 हजार वृक्षरोपणाचा अनोखा उपक्रम
पुणे :6 जून राज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्त्याने शिवधनुष्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी शिवनेरी ते रायगड किल्ला या शिवाजी महाराज पालखी राजमार्गात प्रत्येक दहा फूट अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता
हा संकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने पहिला टप्पा म्हणून शिवजन्मभूमी शिवनेरी ते नारायणगाव या सोळा किमी अंतरामध्ये सामाजिक बांधकाम विभाग ,सामाजिक वनीकरण ,राष्ट्रीय सेवा योजना या सर्वांच्या सयूंक्त विद्यमाने पंधरा हजार वृक्षरोपांची लागवड केल्याची माहिती सार्वजनिक उपविभाग जुन्नरचे उपविभागीय अभियंता जाधव व शिवधनुष्य प्रतिष्ठान संस्थापक विनायक कालेकर यांनी दिली
सामाजिक वनीकरण जुन्नर विभागाचे फल्ले मॅडम यांनी सामाजिक उपक्रमासाठी व जुन्नर परिसर सुशोभूमीकरणाचा उद्देश समोर ठेऊन विविध प्रकारच्या कडुलिंब ,आवळा, चिंच, वड ,पिंपळ यासारख्या अनेक वन वृक्षरोपांची रोपे उपलब्ध करून देऊन या सार्वजनिक उपक्रमात आपल्या विभागाचा सहभाग नोंदविला
वनीकरनाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा ग्रामीण विभाग समनव्यक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, जुन्नर तालुक्यातील ग्रामोन्नोती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, जयहिंद इंजिनिअरिंग महाविद्यालय कुरण,न्यू इंग्लिश खाणगाव,तसेच शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सुमारे तीनशे पन्नास स्वयंसेवक ,पिडब्लूडीचे कॉन्ट्रॅक्टर व त्यांचे सहयोगी ,सार्वजनिक बांधकाम जुन्नर विभाग डेप्युटी इंजिनिअर जाधव, असिस्टंट इंजिनिअर रायकर , स्वप्नील कांबळे, डॉ. लहू गायकवाड, प्रा. गाडेकर, डॉ. संदीप खिल्लारी ,वाईगडे अग्री सोल्युशन चिंचवड व महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला
या सर्व वृक्षरोपांचे भविष्यातील संगोपन ,ट्री गार्ड, पाणी घालण्याची जबाबदारी सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र उचलण्याचे आवाहन शिवधनुष्य प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले