fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षी जागतिक वैद्यकीय उपकरण निर्मितीत अग्रणी राहण्याचा मार्ग प्रशस्त

स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहपर्वात नुकत्याच पार पडलेल्या इंडिया मेडटेक एक्स्पोमध्ये वैद्यकीय उपकरण निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या उदयाचा दृष्टीकोन केंद्रस्थानी दिसून आला.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, मनसुख मांडविय यांनी वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला पुढे नेण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाकांक्षी आराखडा सर्वांसमोर मांडला. भारतीय वैद्यकीय उपकरणे क्षेत्र सध्याच्या ११ अब्ज डॉलर (९,००० कोटी रुपये) वरून आतापासून केवळ सात वर्षांत प्रभावी ५० अब्ज डॉलर (४.५ ट्रिलियन रुपये) पर्यंत वाढण्याचे उत्साहवर्धक चित्र यात सादर करण्यात आले आहे.

हे आव्हान पेलण्यासाठी सामर्थ्यवान होऊन भारतीय वैद्यकीय उपकरणे क्षेत्र ‘मेक इन इंडिया,  फॉर द वर्ल्ड’ धोरणाला आणखी वाढ आणि समर्थन देण्यासाठी सक्षम आहे. असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्री (AiMeD) ने असंख्य अहवालांच्या पुनरावलोकनातून तयार केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या नऊ महिन्यांत, भारतीय वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीत १७% वाढ झाली आहे, तर आयात ८% ने कमी झाली आहे. हे धोरण केवळ देशाच्या आर्थिक क्षमतेलाच अधोरेखित करत नाही तर नवकल्पना आणि स्वावलंबनाला चालना देण्याचा त्याचा हेतू देखील अधोरेखित करते.

“नाविन्यपूर्णतेसाठीची अतूट बांधिलकी, आरोग्यसेवा आणि वैद्यकीय उपकरणांचा विस्तार करणाऱ्या सर्वसमावेशक दृष्टीकोनासह आम्ही उल्लेखनीय वाढ साध्य करण्यासाठी सज्ज आहोत. या क्षेत्राला चालना देण्यासाठी सादर करण्यात आलेले धोरणात्मक उपक्रम हे स्वावलंबन, लवचिकता आणि स्पर्धे प्रति असलेल्या आमच्या बांधिलकीची पावती आहेत. आम्ही या प्रवासाला सुरुवात करत असताना केवळ जागतिक स्तरावर आमचे स्थान मजबूत करत आहोत असे नाही तर एक आरोग्यपूर्ण, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत जगाचा मार्गही मोकळा करतो,” असे मेरिलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संजीव भट्ट म्हणाले.

हृदय आणि मानवी रक्तवहिन्याशी संबंधित आजारांसाठी स्वदेशी विकसित तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने खूप मोठा पल्ला गाठला आहे. या आजारांचे प्रमाण सध्या आपल्या भारतीय लोकांमध्ये खूप जास्त आहे. भारत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहे जे एकतर त्यांच्या पाश्चात्य सहकाऱ्यांच्या बरोबरीचे किंवा त्याहूनही चांगले आहे. मेरिलचे यश हे या महान पराक्रमाचे उदाहरण आहे. त्यांच्याकडे समृद्ध संशोधन आणि विकास पोर्टफोलिओ असून तो विविध व्यावसायिक व्हर्टिकलमध्ये नावीन्य आणतो. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (PCI) प्रक्रियेमध्ये कॅल्शियम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले जाते. त्याचप्रमाणे, स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेंशनमध्ये (Structural heart intervention) , ते डाव्या ऍट्रिअल अॅपेंडेज क्लोजरवर (Atrial appendage closure), मिट्रल व्हॉल्व्हची (Mitral valve) दुरुस्ती आणि रीप्लेसमेंटवर आहेत.

भारताने वैद्यकीय उपकरण निर्मितीमध्ये अग्रणी बनण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केलेला असताना भारत केवळ स्वातंत्र्याचा उत्सवच साजरा करत आहे असे नाही तर आरोग्य सेवा क्षेत्रातील स्वावलंबन आणि नाविन्यपूर्णता यांचेही जोरदार अवलंबन करत आहे.

 

Leave a Reply

%d