महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर स्नुकर गटात पुण्याच्या आरव संचेती याला विजेतेपद !!
दादर क्लब, मुंबई येथे बीएसएएम महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुअर गटामध्ये आरव संचेती याने अंतिम सामन्यात मुंबईच्या रोहन पै याचा ४९-३५, ५७-२२, ७०-०७ असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. उपांत्य फेरीमध्ये आरव याने खारघरच्या जेहान पंजाबी याचा ५७-०२, ७०-२४ असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. या सामन्यात आरव याने पहिल्या फ्रेममध्ये ३८ गुणांचा ब्रेक नोंदविला.
गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईतील दादर क्लब येथे झालेल्या बीएसएएम महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धेमध्ये आरव याने ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. यासह सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर आणि बिलीयर्डस् स्पर्धेतही दुसरे स्थान मिळवून आपली गुणवत्ता सिध्द केली होती. जुलै महिन्यामध्ये झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेतही १२ वर्षीय आरवची निवड झाली होती आणि त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्नुकर स्पर्धेत आरव याने सब-ज्युनिअर स्नुकर गटात चौथा क्रमांक मिळवला होता.
आरव हा यासिन मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली यासिन मर्चंट स्नुकर अॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेतो. तसेच पीवायसी हिंदू जिमखाना आणि अॅमेरोना फन क्लब येथे सराव करतो. हडपसर येथील ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरव ७ वी इयत्तेमध्ये शिकत आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकालः सब-ज्युनिअर स्नुकर गटः
जेहान पंजाबी (खारघर) वि.वि. अब्दुल्ला आफताब (खारघर) ३१-५०, ४१-४०, ५४-३९;
रोहन पै (मुंबई) वि.वि. शिव मिस्त्री (मुंबई) ५८-०१, ७६-४५;
उमर बिरया (मुंबई) वि.वि. जय सिंग (मुंबई) ६०-१३, ५५-३३;
उपांत्य फेरीः आरव संचेती (पुणे) वि.वि. जेहान पंजाबी (खारघर) ५७ (३८)-०२, ७०-२४;
रोहन पै (मुंबई) वि.वि. उमर बिरया (मुंबई) ४६-२३, ६१-२२;
अंतिम सामनाः आरव संचेती (पुणे) वि.वि. रोहन पै (मुंबई) ४९-३५, ५७-२२, ७०-०७.
