Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस च्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती दिनी आदरांजली

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले ‘‘ज्यांनी आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात कोणाबद्दल कधीही अपशब्द न वापरता शांत वृत्तीने आपले मत मांडले, अशी राजीव गांधी यांची पंतप्रधानपदाची यशस्वी कारकीर्द सदैव स्मरणात राहील. इंदिराजींच्या दुदैवी हत्येनंतर भारतामध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्या संकटकाळात पंतप्रधानपदाची अवघड धुरा त्यांना स्वाकारावी लागली. एकविसाव्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण व सामाजिक न्याय या बाबतीत जगाच्या नकाशावर भारत सदैव अग्रक्रमाने राहावा म्हणून राजीव गांधी यांनी जीवाचे रान केले. अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व विद्वानांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने संगणक, दळणवळण या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. महिलांना आरक्षण देऊन राजकारणात महिलांचा सहभाग वाढवला. त्यांच्या प्रसन्न मनाचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर सदैव सर्व भारतीयांना व जगाला पाहायला मिळाले. द्वेष व राग या शब्दांना त्यांच्याजवळ थाराही नव्हता. या महान नेत्याचे बलिदान व्यर्थ जावू नये म्हणून आजच्या पिढीने त्यांचे विचार घेऊन देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे हीच खरी त्यांच्या जयंती दिनी त्यांना आदरांजली ठरेल.’’

यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, लता राजगुरू, अजित दरेकर, संगीता तिवारी, प्रा. वाल्मिक जगताप, हनुमंत पवार, बळीराम डोळे, अक्षय माने, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, अनिल पवार, फैय्याज शेख, नितीन परतानी, गुलाम हुसेन खान, राज घेलोत, देवीदास लोणकर, रोहित लभडे, लतेंद्र भिंगारे, संजय डोंगरे, ॲड. राजेंद्र काळेबेरे, ॲड. विजय तिकोणे, मनोहर गाडेकर, हमीदभाई शेख यांसह युवा अस्मिता संस्थाचे सदस्य आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading