Wednesday, May 13, 2026
Latest NewsSports

जॉय ई- बाइक आता ३ सामन्यांच्या टी२० सीरीज २०२३ इंडिया टुर ऑफ आयर्लंडची टायटल स्पॉन्सर

वडोदरा  – क्रीडा क्षेत्रातील भागिदारी अधिक बळकट करत वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. या भारतातील आघाडीच्या जॉय ई- बाइक ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांचा उत्साह द्विगुणित करणारी घोषणा केली आहे. कंपनीने इंडिया टुर ऑफ आयर्लंड २०२३ शी टायटल स्पॉन्सर या नात्याने सहकार्य केल्याचे जाहीर केले आहे. या लक्षणीय सहकार्यामुळे ही स्पर्धा जॉय ई- बाइक कप म्हणून ओळखली जाणार असून क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता व शाश्वत नाविन्य यांचे ती प्रतीक असेल. यासह जॉय ई- बाइकद्वारे नुकतीच लाँच करण्यात आलेली मिहोस ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक दुचाकी डब्लिन येथील मालाहिडे क्रिकेट क्लबच्या मैदानावर ठेवली जाणार आहे.

जॉय ई- बाइक यापूर्वी डब्लिन येथे झालेल्या इंडिया टुर ऑफ आयर्लंड २०२२ ची पॉवर्ड बाय पार्टनर होती. हे क्रीडा सहकार्य असेच पुढे सुरू ठेवण्यासाठी जॉय ई- बाइक २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जशी अधिकृत ईव्ही भागीदार होती.

या प्रतिष्ठित भागिदारीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि.च्या विपणन आणि ब्रँडिंग विभागाचे अध्यक्ष श्री. तरूण शर्मा म्हणाले, ‘भारताच्या बहुसांस्कृतिक वस्त्रामधला समान धागा म्हणजे क्रिकेट, जो संपूर्ण राष्ट्राला एका विणीत गुंफणारा आहे. भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर पॅशन, संघभावना, चिकाटीचे प्रतीक आहे, ज्याचा प्रतीध्वनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ऐकू येतो. हा खेळ भारतातील उत्साह आणि प्रगतीसह एकत्रपणे नांदणाऱ्या परंपरांचे प्रतीक आहे. जॉय ई- बाइकनेही मोबिलिटी क्षेत्रात शाश्वततेचा धागा गुंफण्याचे व भारताला शाश्वत आणि इलेक्ट्रिफाइंग भविष्याकडे नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उत्पादने पुरवण्याची आमची बांधिलकी क्रिकेटमधल्या अनुकूलता आणि क्रांतीच्या तत्वांशी सुसंगत असल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांना आनंद व प्रेरणा देण्याच्या हेतूने आम्ही आमची उत्पादन श्रेणी तयार केली आहे. जॉय ई- बाइक कपसाठी करण्यात आलेले सहकार्य हे एकी, प्रगती आणि भारतीय संस्कृती आणि ईव्ही क्षेत्रातील आमची क्रांतीकारी उत्पादने यांच्या ताकदीवर असलेल्या विश्वासाची पावती आहे.’

या सहकार्याविषयी क्रिकेट आयर्लंडचे प्रमुख वित्त अधिकारी अँड्र्यू मे म्हणाले, जॉय ई- बाइक या ईव्ही उत्पादन क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीशी सहकार्य करत नवा प्रवास सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटमुळे वेगवेगळ्या प्रांतातील चाहते एकत्र येतात, त्याप्रमाणे या भागिदारीमुळे नाविन्यता व हरित भविष्याप्रती बांधिलकीचे आमच्यातील समान तत्व आणखी दृढ होणार आहे. या उत्कंठावर्धक सीरीजसाठी आयरिश आणि भारतीय क्रिकेट टीम्सचे स्वागत करत असताना समान मूल्ये व आकांक्षा असलेल्या जॉय ई- बाइकचे भागीदार म्हणून स्वागत करतानाही आम्हाला आनंद होत आहे. ही भागिदारी केवळ सहकार्य नाही, तर हा खेळ तसेच हे उद्योगक्षेत्र ज्या दिशेने जात आहे, त्याचे निदर्शक आहे. आम्ही एकत्रितपणे खेळ आणि तंत्रज्ञान तसेच परंपरा व नाविन्याचा हा अनोखा मिलाफ साजरा करत आहोत. इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत नवी क्रांती घडवून आणणाऱ्या जॉय ई- बाइकप्रमाणेच चाहत्यांमध्ये उत्कंठा निर्माण करणाऱ्या या सीरीजसाठी आम्ही उत्सुक आहोत. ही भागिदारी यशस्वी ठरेल आणि सीरीजही तडाखेबाज असेल अशी आशा वाटते.

या सीरीजमध्ये तीन टी-२० सामन्यांचा समावेश असेल, ज्यात जसप्रीत बुमराह कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करतील, तर पॉल स्टिरलिंग आयर्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व करतील. हे सामने जिओसिनेमा अप आणि स्पोर्ट्स१८ चॅनेलवर ऑनलाइन प्रसारित केले जातील.

भारत आणि आयर्लंड सामन्यांची टी२० सीरीज प्रसिद्ध मालाहिडे क्रिकेट मैदान, डब्लिन येथे घेतली जाणार आहे. हे सामने १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान घेतले जातील.

तारीश सामन्यांचे तपशील स्थळ
१८ ऑगस्ट २०२३ आयर्लंड वि. भारत पहिली टी२० मालाहिडे
२० ऑगस्ट २०२३ आयर्लंड वि. भारत दुसरी टी२० मालाहिडे
२३ ऑगस्ट २०२३ आयर्लंड वि. भारत दुसरी टी२० मालाहिडे

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading