Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

बांधकाम कामगारांच्या सन्मानार्थ ‘वॉल ऑफ ऑनर’ उपक्रम

पुणे : ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राष्ट्राच्या उभारणीत भरीव योगदान देणाऱ्या बांधकाम कामगारांच्या सन्मानार्थ पुण्यातील सुरोज बिल्डकॉन या संस्थेने ‘वॉल ऑफ ऑनर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत येत्या बुधवार दि १५ ऑगस्ट रोजी संस्थेच्या प्रत्येक बांधकाम प्रकल्पावर तेथे काम केलेल्या किंवा करत असलेल्या कामगारांच्या नावाची ‘वॉल ऑफ ऑनर’ उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सचिन बियानी यांनी कळविली आहे.

यावेळी बोलताना बियानी म्हणाले, “बांधकाम मजूर हा भारतीय अर्थव्यवस्थेसोबतच बांधकाम क्षेत्राचा देखील कणा आहे. बांधकाम कामगारांचा भारताच्या विकासात मोलाचा वाटा आहे हेच लक्षात घेत आम्ही ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्याचे ठरवले असून याद्वारे बांधकाम कामगारांना सन्मानित करत आहोत. आमच्या प्रत्येक बांधकाम प्रकल्पात ही ‘वॉल ऑफ ऑनर’ स्थापित करण्यात येणार असून यावर प्रकल्पात काम केलेल्या प्रत्येक मजुराचे नाव आम्ही जतन करून ठेवणार आहोत. आमच्या देशभरातील २० हून अधिक प्रकल्पांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या आमचे प्रकल्प प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची उभारणी या प्रकारातील असून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये सुरु आहेत.”

बांधकाम कामगारांच्या महत्त्वाची आणि त्यांच्या परिश्रमाची जाणीव आम्हाला असल्याने प्रत्येक प्रक्ल्पाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कामगारांना अशा पद्धतीने आम्ही सन्मानित करीत आहोत. हा आमच्या मनातील त्यांच्याबद्दल असलेला भाव व्यक्त करणारी कृती असल्याचे देखील सचिन बियानी यांनी नमूद केले. कामगारांविषयीची आमची असलेली बांधिलकी दाखविण्याच्य दृष्टीने आम्ही या विषयावर एक लहानशी चित्रफीत बनविली असून ‘वॉल ऑफ ऑनर’ ही व्हेलॉसिटा ब्रँड कन्सल्टंट्स यांची संकल्पना आहे. बांधकाम उद्योग क्षेत्राद्वारे या उपक्रमाची दखल घेत जास्तीत जास्त कामगारांचा सन्मान व्हावा अशी इच्छा देखील बियानी यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमात सुमारे ४००० हून अधिक कामगारांची नावे वॉल ऑफ ऑनर लिहिली जातील. सदर वॉल ऑफ ऑनर ही त्या प्रकल्पांवर कायम स्वरूपी असेल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading