पीएमपीएमएल कडून १५ व १६ ऑगस्ट रोजी जादा बसेसचे नियोजन
पुणे : दिनांक १५ व १६ ऑगस्ट २०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची व भाविकांची संख्या लक्षणीय असते. सदर बाब विचारात घेता पीएमपीएमएल कडून दि. १५ व १६ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यटकांना व भाविकांना प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना ये-जा करण्याकरीता खालील बस मार्गांवर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
अ.क्र. मार्ग क्र. पासून- पर्यंत अ.क्र. मार्ग क्र. पासून- पर्यंत
१ २१० हडपसर ते जेजुरी १० ११९ म.न.पा. ते आळंदी
२ २१२ हडपसर ते मोरगांव ११ १५१ पुणे स्टेशन ते आळंदी
३ ३६८ निगडी ते लोणावळा १२ २०१ भेकराईनगर ते आळंदी
४ १६१ वाघोली ते रांजणगांव १३ २०० शेवाळवाडी ते आळंदी
५ १८३ हडपसर ते थेऊरगांव १४ ३६० म्हाळुंगेगांव ते आळंदी
६ १८४ हडपसर ते रामदरा १५ ३४४ बाणेरगांव ते आळंदी
७ ५० शनिवारवाडा ते सिंहगड १६ ५२ स्वारगेट ते खानापुर
८ २६२ म.न.पा. भवन ते देहुगांव १७ २०९ कात्रज ते सासवड
९ २९ स्वारगेट ते आळंदी
वरीलप्रमाणे परिवहन महामंडळाकडुन १०१ जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर बससेवेचा प्रवाशी नागरिक, महिला वर्ग, पर्यटक व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनकरण्यात येत आहे.
