Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात साकारणार ‘सर सी. व्ही. रमण रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’

पुणे :  ‘श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशन, वारजे, पुणे’ अंतर्गत विद्यार्थ्यांना बहुआयामी वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा या उद्देशाने ‘सर सी. व्ही. रमण रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’ साकारण्यात आले आहे. वारजे, पुणे मधील एका अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा प्रयोग शाळेत हे केंद्र असणार आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा शुक्रवार  दिनांक १८ ऑगस्ट  रोजी  सकाळी १० वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती  प्रसिद्ध नासा हनीवेलच्या स्पेस एज्युकेटर लीना बोकील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त मनीषा काशिद लोहोकरे आणि हर्षल लोहोकरे उपस्थित होते. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळेतील पहिली आणि त्या पुढील वर्गातील सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री प्रमोद काळे, नेलसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष संदीप अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.

मनीषा काशिद लोहोकरे म्हणाल्या, ‘सर सी. व्ही. रमण रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’ या उपक्रमा अंतर्गत आम्ही अतिशय विचारपूर्वक विषय निवडले आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, वैदिक मॅथ्स, बॉटनी, झूलॉजी, स्पेस सायन्स, इन्व्होर्मेन्ट सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, रोबोटीक्स. या आणि अशा विविध कौशल्य विकासाला पूरक विषयांवर विध्यार्थ्यांना व्यावसायिक प्रक्षिक्षण दिले जाईल.

हर्षल लोहोकरे म्हणाले, विज्ञानाचा प्रसार करणे आणि त्याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेणे यामाध्यमातून आपापल्या हाताने प्रयोग करण्याची संधी मुलांना मिळणार आहे. विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी आणि भविष्यात भारतात शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या उद्देशाने उपक्रम हातात घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading