Wednesday, May 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतकऱ्यांसाठी काळजीची बातमी ; राज्यात पाऊस परतणार पण …

पुणे :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, ऑगस्टच्या सुरवातीपासूनच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यात 15 ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. परंतु, आता ऑगस्ट महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

IMD चे संचालक के. एस. होसळीकर यांनी ट्वीट द्वारे दिलेल्या माहितीनुसार, पावसाला पूरक असलेले हवामान हिमालयाच्या पायथ्याशी सरकल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र या आठवड्यात पाऊस पुन्हा एकदा राज्यात परतणार आहे. महाराष्ट्र 18-24 ऑगस्ट दरम्यान मध्यमहाराष्ट्र, विदर्भ व सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत काही ठिकाणी शक्यता आहे. तर 25 – 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, कोंकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड भागात पावसाची शक्यता आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 7 दिवसांत मध्य (महाराष्ट्रसहीत), पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये मोठ्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

दरम्यान, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण गेल्या 10-12 दिवसात अत्यल्प आहे. त्यामुळे कृषीसाठी हा काळजीचा विषय आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading