Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

काँग्रेसचे दरवाजे वंचित बहुजन आघाडीसाठी खरंच खुले असतील तर त्यांनी युतीचा लेखी प्रस्ताव पाठवावा – सिद्धार्थ मोकळे

 

मुंबई : ‘काँग्रेसचे दरवाजे वंचित बहुजन आघाडीसाठी खरंच खुले असतील तर काँग्रेस ने वंचित बहुजन आघाडीला युतीचा लेखी प्रस्ताव पाठवावा’, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, युतीसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत असे, वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, ‘विजय वडेट्टीवार जे म्हणाले ते जर खरं असेल, काँग्रेसचे दरवाजे वंचित बहुजन आघाडीसाठी खरंच खुले असतील तर त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे युतीचा लेखी प्रस्ताव पाठवावा.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading