Thursday, May 14, 2026
ENTERTAINMENTLatest News

तमन्ना भाटियाची अनोखी वेब सीरिज ” आखरी सच” चा ट्रेलर लाँच ! 

‘थलैवा’ रजनीकांतसोबतचा तिचा अलीकडील तमिळ चित्रपट जेलरच्या यशामुळे आणि मेगास्टार चिरंजीवी भोला शंकर यांच्यासोबतचा तिचा तेलेगु चित्रपट रिलीज झाल्याच्या चर्चा दरम्यान, तमन्ना भाटियाच्या पुढील वेबसिरीज आखरी सचचा ट्रेलर लाँच झाला आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे केंद्रबिंदू बनलेल्या युगात, आकर्षक मालिकेच्या ट्रेलरच्या अनावरणामुळे प्रेक्षकांमध्ये आणि जगभरातील प्रतिभावान अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
या आकर्षक वेब सीरिज मध्ये तमन्ना जी मुख्य तपास अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारण्याची तयारी करत आहे. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेसह जेलर अभिनेत्री तिच्या सगळ्या भूमिका मध्ये ती नेहमीच उत्तम काम करतेय. तमन्ना म्हणते “जेव्हा आखरी सच माझ्याकडे आली तेव्हा ही एक कथा होती ज्याने माझं मन जिंकून घेतलं.हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे – पहिले कारण, मी पहिल्यांदाच एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका एका लांबच्या फॉरमॅटमध्ये करत आहे.या कथेचा एक भाग बनून मला डिस्ने+ हॉटस्टार सोबत जगासमोर नेण्यात आनंद होत आहे “
आखरी सच फक्त Disney+ Hotstar येणार आहे. फिल्म्स निर्मित आणि रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित ही मालिका सौरव डे यांनी लिहिली आहे. अभिनेत्री अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग, दानिश इक्बाल, निशू दीक्षित, क्रिती विज आणि संजीव चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. आखरी सच, जेलर आणि भोला शंकर व्यतिरिक्त अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मल्याळममध्ये बांद्रा, तमिळमध्ये अरनामनाई 4 आणि जॉन अब्राहमसह हिंदीमध्ये वेदा हे चित्रपट ती करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading