भारत मुक्ती मोर्चा विरोधात भाजप युवा मोर्चाची पोलिस स्टेशन मध्ये धाव…..
पुणे : 7 ऑगस्ट 2023 रोजी पुणे शहरा मध्ये बामसेफ आणि इतर संघटनां कडून बेकायदेशीर पणे रस्त्यावर उतरून रस्ता आडवून नागरिकांना दुकान बंद करण्या साठी सांगण्यात येत होते तसेच
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे सरसंघचालक मोहन जी भागवत यांच्या विरोधात पुणे शहरा मध्ये भर रस्त्यामध्ये लाऊड स्पीकर वर शिविगाळ करून घोषणा बाजी करत होते . समाजा मध्ये तेढ़ निर्माण करणाऱ्या या संघटने च्या 100 ते 150 समाजकंटका विरोधात भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज जी घाटे आणि क़सबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत जी रासने यांच्या मार्गदर्शना खाली क़सबा मतदारसंघा चे भाजप युवा मोर्चा चे अध्यक्ष अमित जी कंक यांनी फारासखाना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून संबंधित समाजकंटका वर गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
या वेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार जी दांमगुडे , भाजप कसबा मतदारसंघ चिटनीस अमोल जी शुक्ला , पुणे शहर कार्यालय मंत्री सजंय मामा देशमुख , भाजप पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस राजू परदेशी , दीपक पवार , सुनील मिश्रा , पुणे शहर युवा मोर्चा संपर्क प्रमुख मनीष जी पाडेकर , ओबीसी आघाडी शहर युवा मोर्चा प्रमुख तुषार रायकर ,क़सबा मतदारसंघ युवा मोर्चा सरचिटणीस प्रणव गंजीवाले , संपर्क प्रमुख सुरेंद्र ठाकुर , प्रभाग 15 युवा मोर्चा उपाध्यक्ष कुणाल आहेर आदि पदाधिकारी उपस्थित होते .
