अॅमेझॉनने एकत्रितपणे ६२ लाखांहून अधिक एमएसएमईचे केले डिजीटलीकरण
बंगळुरू : अॅमेझॉन इंडियाने आज भारताप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचा एक भाग म्हणून जाहीर केलेल्या प्रतिज्ञांचे अपडेट शेअर केले आहेत. अॅमेझॉनने आजपर्यंत एकत्रितपणे ६२ लाखांहून अधिक एमएसएमईचे (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) डिजीटलीकरण केले, जवळपास ८ अब्ज डॉलरची निर्यात केली आणि १३ लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली असल्याचे जाहीर केले आहे. अॅमेझॉनने १ कोटी (१० दशलक्ष) एमएसएमईचे डिजिटायझेशन करण्याचे, २० अब्ज डॉलरची एकत्रित निर्यात सक्षम करण्याचे आणि २०२५ पर्यंत भारतात २० लाख (२ दशलक्ष) नोकर्या निर्माण करण्याचे वचन दिले होते. अॅमेझॉन आपली अभिवचने पूर्ण करण्याच्या योग्य मार्गावर आहे.
साधारण दोन वर्षांपूर्वी डिजिटल इंडियाच्या शक्यता खुल्या करण्यासाठी उत्सुक तंत्रज्ञान प्रणीत स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी अॅमेझॉनने २५० दशलक्ष डॉलरच्या अॅमेझॉन संभव व्हेंचर फंडची घोषणा केली होती. व्हेंचर फंड उद्योजकांना भारतात नाविन्यपूर्णता, शोध, निर्माण आणि उत्पादन करण्यासाठी सक्षम करण्यावर केंद्रित आहे. गेल्या २४ महिन्यांत व्हेंचर फंडाने फ्रेशटूहोम, , ‘XYXX’, हॉपस्कॉच, फिटरफ्लाय, कॅशीफाय, मायग्लॅम, M1xchange आणि स्मॉलकेस यासह अनेक गुंतवणूकी केल्या आहेत.
अॅमेझॉन इंडियाच्या इंडिया कंझ्युमर बिझनेसचे कंट्री मॅनेजर मनीष तिवारी म्हणाले: “आम्ही देशभरातील लाखो सूक्ष्म-उद्योजक, छोटे व्यवसाय आणि स्टार्टअप्ससोबत काम करत असल्यामुळे आम्ही नवीन साधने, तंत्रज्ञान आणि नवकल्पना आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यामुळे भारतीय व्यवसायांमधील उद्योजकीय आकांक्षा मुक्त होईल, देशातून निर्यातीला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करण्यात मदत होईल. आमचा ठाम विश्वास आहे की तंत्रज्ञान आणि मोबाइल इंटरनेट भारताच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम करत राहतील आणि देशाच्या डिजिटल परिवर्तन आणि आधुनिक, भरभराट होत असलेली डिजिटल अर्थव्यवस्था यामध्ये अॅमेझॉन मोठी भूमिका बजावत असल्याचे आम्हाला दिसत आहे.”
अॅमेझॉनने ६२ लाखांहून अधिक (६.२ दशलक्ष) एमएसएमईना केले डिजिटली सक्षम
अॅमेझॉन इंडियाने विक्रेते, कारागीर आणि विणकर, डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक सेवा भागीदार इत्यादींसह ६.२ दशलक्ष एमएसएमईचे डिजिटलीकरण केले आहे. अॅमेझॉनचे डिजिटलीकरणाचे प्रयत्न स्थानिक रिटेल स्टोअर्स, कारागीर आणि तळागाळातील उद्योजकांसह लहान व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची पोहोच आणखी विस्तृत करण्यासाठी सक्षम करत आहेत. संपूर्ण भारतातील लाखो एमएसएमईंना ऑनलाइन विक्री आणि ई-कॉमर्स सुलभ करण्यासाठी, अॅमेझॉन इंडियाने अलीकडेच Simplified Registration, Sale Event planner, न्यू सेलर सक्सेस सेंटर आणि यासह अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगवरील भारतीय निर्यातदार एकत्रित ईकॉमर्स निर्यातीत ८ अब्ज डॉलर ओलांडण्याच्या मार्गावर अॅमेझॉन भारतीय व्यवसायांना २०० हून अधिक देश आणि प्रदेशांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी, भारतातून जागतिक ब्रँड तयार करण्यात आणि आपल्या ग्लोबल सेलिंग कार्यक्रमाद्वारे निर्यात वाढवण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या कार्यक्रमाला वेग आला असून आज या कार्यक्रमात १.२५ लाखाहून अधिक निर्यातदार आहेत. ते २०२३ च्या अखेरीस ८ अब्ज डॉलर्सची एकत्रित निर्यात पार करण्याच्या मार्गावर आहेत. अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगला पहिल्या पाच अब्ज डॉलर्सची एकत्रित निर्यात सक्षम करण्यासाठी सात वर्षे लागली आणि पुढील तीन अब्ज डॉलर्स सक्षम करण्यासाठी सुमारे १८ महिने लागतील.
अॅमेझॉनकडून भारतात एकत्रितपणे १३ लाख (१.३ दशलक्ष) पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती अॅमेझॉनचे एमएसएमईचे डिजिटायझेशन करण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न आणि देशातून निर्यातीला चालना देणे यातून परिसंस्थेत हजारो रोजगार संधी निर्माण करण्यात मदत मिळत आहे. गेल्या एका वर्षात, अॅमेझॉनने आयटी, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग, कंटेंट क्रिएशन, स्किल डेव्हलपमेंट आणि अशा इतर अनेक उद्योगांमध्ये सुमारे १.४ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यास मदत केली तसेच विक्रेता समाजात अॅमेझॉनने अप्रत्यक्षपणे नोकऱ्या निर्माण करण्यास मदत केली आहे.
