Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

शासनाच्या नियमानुसार फूड पॅकेजिंग हवे : दिलीप संगत

पुणे : आपल्या प्रॉडक्टचे दमदार मार्केटिंग होण्यासाठी त्याचे पॅकिंगही शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून तेवढेच आकर्षक पाहिजे. कारण उत्तम पॅकिंग केलेल्या प्रॉडक्टसला ग्राहकांकडून जशी वाढती मागणी आहे. तशी व्यवसाय वाढीसाठी ‘फॉसकॉस – एफएसएसएआय’ च्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीही अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रॉडक्टबद्दलची इत्यंभूत माहिती पॅकिंग आणि लेबलवर देणे आता व्यावसायिकांना अनिवार्य आहे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी सहआयुक्त दिलीप संगत यांनी केले.

मिठाई, फरसाण, डेअरी असोसिएशन, पुणेतर्फे आयोजित ‘जाणून घ्या पॅकेजिंगचे महत्व’ याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे यांच्यासह फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी, मधुरा पाटणकर, असोसिएशनचे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी,केदार चितळे, योगेश अगरवाल,सचिन गाडवे,दिलीप बुधानी,अमित अग्रवाल,प्रशांत डाटा,दिनेश अगरवाल,मकरंद गाडवे, कैलास झंवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दिलीप संगत यांनी ‘फॉसकॉस – एफएसएसएआय ‘बाबत तसेच परवाना/नोंदणी, अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी कायदयाचे पालन किती महत्वाचे आहे याकडे लक्ष वेधले. प्रॉडक्ट पॅकिंग , लेबलवर कुठल्याही परिस्थितीत ग्राहकांची दिशाभूल करणारा मजकूर अजिबात नसावा. असे स्पष्ट करून दिलीप संगत म्हणाले, अन्न पदार्थ कोणता, घटक पदार्थ काय , पोषक तत्व, किती ऊर्जा, फॅट्स तसेच शाकाहारी , मांसाहारी अन्नपदार्थ याचे चिन्ह,वजन, बॅच, लॉट नंबर, उत्पादन तारीख,पदार्थ वापरण्याची अंतिम मुदत यासह जे जे नियम शासनाने दिलेले आहेत.त्यानुसार प्रॉडक्टचे पॅकेजिंग असणे बंधनकारक असून त्यावर कस्टमर केअर क्रमांकही नमूद असावा, असेही ते म्हणाले. तर फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी यांनी फुड प्रोसेसिंग, क्वालिटी, फॅट्स,स्टॅंडर्ड, लॅब तपासणी यासह पॅकिंगबाबत शासनाची नियमावली व एफएसएसएआयचा नवा कायदा यावर सविस्तर माहिती दिली. मधुरा पाटणकर यांनी फूड पॅकेजिंग आणि लेबलिंग यावर मार्गदर्शन करताना ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. पॅकेजिंगचे विविध प्रकार, त्यांची मानांकने , पॅकेजिंग मटेरियल, वाहतुक यावर सविस्तर मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे यांनी व्यवसाय वाढवायचा असेल तर ब्रॅण्डिंग, पॅकेजिंगसाठी अपडेट राहणे आवश्यक आहे. तरच भारतीय बाजारपेठांमध्ये परदेशी कंपन्यांचा शिरकाव रोखला जाईल. असे नमूद केले. यावेळी सुरेंद्र नाशिककर, अमित गुरव यांनीही अन्न पदार्थांची प्रयोगशाळा चाचणी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित चौधरी, ऋषभ बुधानी, भरत पुरोहित यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव अमित अग्रवाल यांनी केले तर मकरंद गाडवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading