Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कात्रज कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात १ ठार

पुणे : कोंढवा येथील खडी मशीन चौकी समोर कात्रज कोंढवा बायपास येथे सिमेंटचे पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने त्याच्यापुढे जात असणाऱ्या एकूण 8 ते 10 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकी स्वार मयत झाला आहे. यावेळी सुदैवाने विद्यार्थी वाहतूक करणारी बस थोडक्यात बचावली. 


कोंढवा पोलीस हद्दीमध्ये स्मशानभूमी समोर खडीमशीन पोलीस चौकी जवळ अपघाताचा प्रकार घडला आहे. सिमेंट पाईप वाहतूक करणारा ट्रक रजि नंबर mh 14 gd 6919 या वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने त्याची धडक इतर वाहनांना बसून अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर अपघातात एकूण 8 वाहनांचे नुकसान झालेले आहे. अपघातात प्रशांत कृष्णा चोरे, वय 43 वर्षे, रा धनकवडी, पुणे यांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सात इसम जखमी झाले आहेत. मयत इसमास ॲम्बुलन्सने ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमी इसमाना जवळील भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघात ग्रस्त वाहनांची माहिती पुढील प्रमाणे…
MH 12 DC 3278 pashion
MH 12 ET 9752 CAR
MH 12 JW 8064 PASHION PRO
MH12 MK 9387 SHINE
MH12 TV 4208 TEMPO
MH12 MV 6018 TEMPO
MH12 NE 6501 MAHINDRA CAR
MH12 UK 1449 ROYAL ENFIELD

अपघात ग्रस्त वाहनावरील चालकाचे नाव तेजस रामभाऊ काकडे, वय 22 वर्षे, रा मुक्काम पोस्ट साबळा तालुका केज जिल्हा बीड असे आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी कोंढवा पोलीस प्रयत्नशील होते.

खराब रस्ते, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष व मोठ्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. नागरिकांनी नियमबाह्य, अवेळी अवजड वाहतुकीबाबत चिंता व्यक्त केली आहे. वाहतूक उपायुक्त यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शहरात व उपनगरात बंदी असलेल्या वेळी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सदर अपघातत् संस्कृती स्कूल, उंड्री बस थोडक्यात बचावली आहे. बसमधे मुले होती परंतु सुदैवाने मुले जखमी नाहीत. ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे. वाहन MH12NX2185 असे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading