Thursday, September 3, 2026
BusinessLatest News

टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ १० ऑगस्ट रोजी खुला होणार

पुणे : टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडने (“कंपनी”) इक्विटी समभागांसाठी आपला आयपीओ (“ऑफर”) गुरुवार १० ऑगस्ट २०२३ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी ही बोली/ऑफर बुधवारी ०९ ऑगस्ट २०२३ रोजी खुली होईल.  बोली/ऑफर सोमवार१४ ऑगस्ट २०२३ रोजी समाप्त होईल.

प्राईस बँड प्रति इक्विटी समभाग १८७ रुपये ते १९७ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ७६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ७६च्या पटीत बोली लावता येईल.

या ऑफरमध्ये ६००० मिलियन रुपयांपर्यंतचे इक्विटी समभाग नव्याने जारी करण्यात येणार असून १,४२,१३,१९८ पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी सादर करण्यात येणार आहेत. विक्रीसाठी सादर करण्यात येत असलेल्या इक्विटी समभागांमध्ये ओमेगा टीसी होल्डिंग्स पीटीई लिमिटेडकडून १,०७,३४,५६५ पर्यंतटाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडून ९,८४,८२३ पर्यंतकोटक स्पेशल सिच्युएशन्स फंडकडून १,००,००० पर्यंत आणि टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेडकडून १,००,००० (समभागांची विक्री करणारे गुंतवणूकदार) आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या जोडपत्र ए अंतर्गत काही समभागधारकांकडून २२,९३,८१० पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी सादर करण्यात आले आहेत. समभागांची विक्री करण्यास इच्छुक असलेले गुंतवणूकदार व इतर समभागधारक यांना एकत्रितपणे “विक्री करत असलेले समभागधारक” असे संबोधण्यात आले असून त्यांच्या प्रस्तावाला “विक्रीसाठी ऑफर” असे संबोधण्यात आले आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम१९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”)सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(२) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईलयासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. या नेट ऑफरमधील जास्तीत जास्त १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग ०.२ मिलियन रुपयांपेक्षा जास्त आणि १ मिलियन रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १ मिलियन रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि जास्तीत जास्त १०% भाग सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे रिटेल व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहेपण त्यासाठी अशा उप-विभागांपैकी एकातील सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग  नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सच्या इतर उप-विभागातील अर्जदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या  खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या दोन्हींमध्ये सूचिबद्ध केले जाण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स जेएम फायनान्शियल लिमिटेडऍक्सिस कॅपिटल लिमिटेडजे पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडबीएनपी परिबासनुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (आधीची एडेलवीज सिक्युरिटीज लिमिटेड) आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading