Saturday, May 9, 2026
BusinessLatest NewsPUNE

प्लॅनेट सिमने जल व्यवस्थापनात प्रस्थापित केलं नवीन रेकॉर्ड: पुण्यातील १५,००० फ्लॅटमध्ये ६०० दशलक्ष लिटरचे व्यवस्थापन

पुणे  : रिअल इस्टेट विकासामध्ये प्रॉपटेक आणि ईएसजी कंप्लायंट सोल्यूशन्स एकत्र करून परवडणाऱ्या वाजवी किंमतीतील घरांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य जागतिक दर्जाची कंपनी असलेल्या प्लॅनेट स्मार्ट सिटीने कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल समुदाय निर्माण करण्याच्या प्रयत्नात भारतात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कंपनीने तिच्या डिजिटल बिझनेस युनिटद्वारे अंतर्गत विकसित केलेल्या प्लॅनेट सिम या प्रगत जल व्यवस्थापन प्रणालीद्वारे तब्बल ६०० दशलक्ष (६० कोटी) लिटर पाण्याचे यशस्वीरित्या व्यवस्थापन केल्याचे आज जाहीर केले. पुण्यातील एकूण १५,००० फ्लॅट्स असलेल्या विविध रहिवासी समुदायांमध्ये ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली.

प्लॅनेट सिम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून प्लॅनेट स्मार्ट सिटी निवासी समुदायांमध्ये जल व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्यात आघाडीवर आहे. ईएसजी निकषांबाबत कंपनीच्या बांधिलकीचा परिणाम इतरांमध्ये पाण्याचा वापर इष्टतम करण्यात आणि निवासी जिल्ह्यांमध्ये शाश्वततेला चालना देण्यासाठी होतो. अनेक निवासी संकुलांमध्ये २५% पर्यंत घट होत या प्लॅटफॉर्ममुळे पाण्याची भरीव बचत झाली. सध्या, ही प्रणाली पुण्यातील ५० हून अधिक  सोसायट्यांच्या जलप्रणालीचे सक्रियपणे निरीक्षण आणि व्यवस्थापन करत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येसह पाण्याच्या वापराच्या पद्धतींवर उल्लेखनीय प्रभाव पडत आहे. २०२३ च्या अखेरीस शेकडो सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

या यशावर भाष्य करताना प्लॅनेट स्मार्ट सिटीचे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्को पिलिया म्हणाले, “प्लॅनेट स्मार्ट सिटीमध्ये, प्लॅनेट सिमच्या व्यावसायिकीकरणाच्या सुरुवातीपासून ७ महीने इतक्या कमी कालावधीत इतका महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचा आणि सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभावाला चालना देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या प्लॅनेट सिम या प्रगत जल व्यवस्थापन प्रणालीद्वारे आम्ही पुण्यातील अनेक प्रकल्पांमध्ये यशस्वीरित्या ६०० दशलक्ष लीटर पाणी व्यवस्थापित केले आहे. आणि ही संख्या वाढतच आहे. यावरून समुदायांना जलस्रोतांचे जतन करण्यात आणि समतोल भविष्यात योगदान देण्यात मदत करण्यास सक्षम करत प्लॅनेट सिमची परिणामकारकता दिसून येते. भारतातील निवासी जिल्ह्यांच्या मोठ्या भागामध्ये गंभीर प्रश्न सोडवत आम्ही वाढत्या महत्त्वाच्या समस्येचा सामना करत आहोत. प्रॉपटेक आणि ईएसजी कंप्लायंट सोल्यूशन्स एकत्र करून निवासी विकास कामांमध्ये बदलून शाश्वत, सर्वसमावेशक आणि एकत्रित जोडलेला समाज निर्माण करणे हा आमचा दृष्टीकोन आहे. आम्ही सर्वांसाठी अधिक चांगले आणि हरित भविष्य घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

“प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर आणि लाभ घेताना तसेच त्याचा आमच्या गृहनिर्माण संस्थेवर झालेला महत्त्वपूर्ण परिणाम पाहण्यात आम्हाला आनंद होत आहे,” असे स्पार्कल्स अॅव्हेन्यू सीएचएसचे अध्यक्ष रावसाहेब म्हणाले. “कंपनीचे प्रगत तंत्रज्ञान आणि जलसंवर्धनासाठी सक्रिय दृष्टीकोन याद्वारे, आम्ही पाण्याच्या वापरामध्ये लक्षणीय घट अनुभवली आहे आणि पाण्याशी संबंधित कामकाज चालवण्यामध्ये लक्षणीय इष्टतम परिणाम अनुभवला आहे. परिणामी खर्चात बचत झाली असून आमच्या रहिवाशांसाठी अधिक शाश्वत राहणीमान वातावरण तयार झाले आहे. अधिक चांगला, अधिक सक्षम समाज निर्माण करण्याची  प्लॅनेट स्मार्ट सिटीची बांधिलकी खरोखर प्रशंसनीय असून त्यांच्या महत्वपूर्ण उपक्रमांशी निगडीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

ज्या सोसायट्यांमध्ये प्लॅनेट सिम सर्वात जास्त काळ बसवले गेले आहे, तेथे आम्ही १२  महिन्यांच्या कालावधीत २५% पर्यंत मासिक पाणी बचत केली आहे. त्यामुळे सरासरी मासिक वापर ६००.००० लिटर पाण्याने कमी झाला आहे. ज्या सोसायट्यांना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत होते अशा संस्थांमध्ये अशा कपातीची जर आपण कल्पना केली, तर आपल्या पर्यावरणासाठी अर्थपूर्ण फायद्यांसह, पाणी खरेदी कमी केल्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक लाभ मिळतील.

शिवाय, बर्‍याच सोसायट्यांच्या जल व्यवस्थापन उपक्रमांसाठी २ ते ३ कर्मचार्‍यांची आवश्यकता असते, प्लॅनेट सिमसह ते एका व्यक्तीद्वारे सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते आणि अतिरिक्त स्त्रोत अधिक अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये वापरले जाऊ शकतात.

प्लॅनेट सिम सिस्टीमद्वारे संकलित केलेल्या डेटामध्ये वापर करण्याच्या पद्धतींचे आणि सुधारात्मक कृती सुरू करण्याची प्रचंड क्षमता आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटी संभाव्य पाणी गळतीचा मागोवा घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी, सतत देखरेख आणि वेळेवर सुधारात्मक उपाय पुरवत डेटाच्या या संपत्तीचा वापर करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

प्लॅनेट सिमसह प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट २०२३ च्या अखेरीस शेकडो सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे आणि ते पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी सज्ज आहे. ग्राहक  आधाराच्या विस्तारामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्यात आणि खर्च कमी करण्यात मदत होईल, शिवाय जमा झालेला मोठ्या प्रमाणातील डेटा कंपनीसाठी नवीन संधी खुल्या करेल. उदाहरणार्थ घरगुती पाणी वापरासाठी अंदाज मॉडेल सुधारित करण्याची क्षमता. पाणीटंचाईसारख्या महत्त्वाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी प्लॅनेट स्थानिक प्राधिकरणे आणि नगरपालिकांना मदत करण्यास तयार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading