BIG NEWS : राहूल गांधीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली : मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात हायकोर्टाने कॉँग्रेस नेते राहूल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे राहूल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( Supreme Court stays Rahul Gandhi’s sentence)
सुप्रीम कोर्टात आज (दी. 4) दुपारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गुजरात हायकोर्टाच्या निकालाला आव्हान देणार्या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणात आज राहुल गांधींच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला, की त्यांनी भाषणात कोणाचेही नाव घेतलेले नाही. शिवाय गांधींनी माफी मागण्यास नकार दिला पण दोषी ठरविण्याची विनंती केली होती, हे निदर्शनास आणून दिले. यावर न्यायालयाने “एवडी कठोर शिक्षा का? या विषयी गुजरात स्थानिक न्यायालयाच्या निकालात स्पष्ट उल्लेख नसल्याचे सांगत गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
कर्नाटकातील एका सभे दरम्यान राहूल गांधी यांनी मोदी आडनावा वरून टिपणी केली होती. या प्रकरणी गुजरात स्थानिक न्यायालयाने राहूल गांधी यांना मोदी आडनावाचा अपमान केल्या बद्दल दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे राहूल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ही ठरवण्यात आले होते. त्यामुळे गुजरात स्थानिक न्यायालयाच्या निर्णया विरोधात गांधी यांनी गुजरात हायकोर्टात देखील याचिका दाखल केली होती. मात्र गुजरात हायकोर्टाने देखील दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. या विरोधात राहूल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज निर्णय देण्यात आला आहे.
