Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

Movie Review – ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’

करण जोहर दिग्दर्शित most awaited movie ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा  रिलीज झाला आहे.  करण जोहरचा चित्रपट म्हटलं की love story, family ड्रामा आणि इमोशनल लोचा असणार हे उघड आहे.  मनोरंजनाच्या पलीकडे काही वास्तव गोष्टींवर सडेतोड भाष्य करणारा  हा चित्रपट कसा आहे? प्रेक्षकांनी थिएटर मध्ये जावून पहावा का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात. 

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक फॅमिली -रॉमकॉम ड्रामा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर वरून हा चित्रपट कशावर असावा याबाबत पुरेशी कल्पना येते. पण चित्रपट सुरू झाला की तुम्हाला एक सुखद धक्का मिळतो. तो म्हणजे ही केवळ  रॉकी आणि राणीची प्रेम काहानी नाही तर रॉकीच्या आजोबांची अर्थात कंवल आणि राणीच्या आजीची अर्थात  जामिनी यांची सुद्धा प्रेम कहाणी आहे. यामध्ये रॉकीच्या आजोबांची भूमिका एव्हर ग्रीन हॅंड्सम होरो धर्मेंद्र यांनी तर राणीच्या आजीची भूमिका ब्युटी क्वीन शबाना आजमी यांनी साकारली आहे. कंवल  यांचा स्मृतीभ्रश  झाला असून त्यांना केवळ जामीनी च आठवते . या पार्श्वभूमीवर त्यांची स्मृती परत आणण्यासाठी जामिनी चा शोध सुरू होतो. इतकच नव्हे तर जामिनी  भेटल्यावर त्यांची अर्धवट राहिलेल्या प्रेम कहाणीमधील काही क्षण एकत्र घालण्यासाठी रॉकी आणि राणी मदत करतात. अन् त्याच दरम्यान या दोघांचीही लव्ह story खुलते. 

पण या दोघांमध्ये आणि त्यांच्या फॅमिली मध्ये खूप फरक आहे. रॉकी हा पंजाबी परिवारातील असून average education झालेला, दिल्लीतील करोलबाग परिसरात राहणारा एका बड्या बिजनेस ग्रुपचा एकलौता वारीस आहे. तर राणी ही बंगाली असून परदेशात शिक्षण घेतलेली, हुशार, पत्रकार म्हणून काम करणारी, स्वाभिमानी careerist woman आहे. तिची आई दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक आहे, वडील पारंगत कथ्थक dancer आहेत. शिवाय आजी कविता आणि शायरी करणारी थोडक्यात स्मार्ट आणि modern फॅमिली आहे. तर रॉकीची फॅमिली ही orthodox family असून घरात केवळ आजीचंच चालत. यामध्ये रॉकी च्या स्ट्रॉंग आजीची भूमिका ही जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी साकारली आहे. मग राणी आणि रॉकी आपल्या लग्नासाठी फॅमिली ला कस तयार करतात. त्यात ते यशस्वी होतात का नाही. यांचा सगळा प्रवास म्हणजे हा चित्रपट आहे. शिवाय कंवल आणि जामिनी यांच काय होत हे ही या चित्रपटात पाहणं उत्कंठावर्धक आहे. 

संपूर्ण family entertain असलेल्या या चित्रपटात जुनी हिंदी गाणी चार चाँद लावतात. यांची थोडी  फार कल्पना ‘ what jhumaka ?’ या गाण्यावरून आलीच होती. तुम्ही जर old Bollywood song lover असताल तर नक्की हा चित्रपट पहा. शिवाय यामध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग आहे. क्षितीचा हा पहिला हिंदी  चित्रपट आहे. तिने यामध्ये रणविर सिंग च्या आईची भूमिका साकारली आहे. धर्मा प्रॉडकाशन या बिग बजेट  चित्रपटात मिळालेल्या संधीचे तिने अक्षरशः सोनं केलं आहे. बॉलीवूडच्या तगड्या स्टारकास्ट समोर क्षितीने आपल्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिने साकारलेली loving, caring आणि स्वतःची स्वप्न कुटुंबासाठी त्यागलेली पंजाबी आई अन् संधी मिळाल्यावर स्वतःच्या स्वाभिमानासाठी नवरा व सासूच्या विरोधात उभी राहणारी पूनम या चित्रपटात ठसठशीत उठून दिसते. 

रणविर  सिंग ने साकारलेला रॉकी हा फक्त तोच परफॉम करू शकतो असा अफलातून अभिनय रणवीरने केला आहे. तसेच आलियाची dialog delivery आणि तिचा साडीतील लुक हा भारी आहे. अनेक दिवसांनंतर एखाद्या चित्रपटात अभिनेत्री ही मोस्ट ऑफ द टाइम साडीत दिसलेली आहे. त्यामुळे लवकरच या साड्यांचा ट्रेंड देखील येईल यात शंका नाही. कलाकारांच्या दमदार अभिनया  बरोबरच चित्रपटातील गाणी, लोकेशन, संवाद हे प्रेक्षकांवर छाप पाडून जातात.

सर्वात महत्वाचे हणजे हा टिपिकल करण जोहर स्टाइल वाटणार चित्रपट Gender equality, Body shaming, color discrimination यावर सुद्धा थेट भाष्य करतो. थोडक्यात सांगायचे तर एक मनमोहक कथा, श्रवणीय  गाणी, कलाकारांचा दमदार अभिनय  यामुळे तुम्ही ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ च्या प्रेमात पडाल यात शंका नाही. 

चित्रपट – रॉकी और राणी की प्रेम कहानी’

निर्माता – हिरू जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता

दिग्दर्शक – करण जोहर

संगीत – प्रीतम

कलाकार – रणविर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी, क्षिती जोग

रेटिंग – ****

  • प्रज्ञा भोसले -पंडित  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading