सिंहगड रस्त्यावर ऐन अतिवृष्टीत सुडबुद्धीने नियमित मिळतीवर अतिक्रमण कारवाई: काँग्रेसचा आरोप
पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी हद्दीतील लगड मळा ते दळवीनगर नांदेड सिटी गेट पर्यंतच्या अनाधिकृत बांधकामावर आज शुक्रवारी पालीकेने धडक कारवाई करुन बांधकामे टपऱ्या शेड दुकाने जमीनदोस्त केली.
या कारवाईचा खडकवासला विधानसभा काँग्रेसने निषेध केला आहे. अनेक नियमित मिळकतींवर बड्या बिल्डरच्या फायद्यासाठी सुडबुद्धीने ऐन अतिवृष्टीत नियमबाह्य कारवाई करण्यात आली आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, पावसाळ्यात अतिक्रमण कारवाई केली जात नाही. या आधीही येथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती त्यावेळी नोटीस दिल्यानंतर अनेक मिळकतदारांनी शेड, दुकानांचे शटर, बांधकामे मागे घेतली . आता याच मिळकतीवर अचानक कारवाई करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे पालिकेला कर दिला जात आहे. अशा मिळकतींचे सुडबुद्धीने कारवाई करुन लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या विरोधात तीव्र जन आंदोलन सुरू केले जाणार असून शासनाकडे दाद मागितली जाणार आहे.
