पालकांशी मोकळेपणाने संवाद साधा – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी
पुणे : सुरक्षित जीवन जगण्यासाठी मुलींनी पालकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज असल्याचे मत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी शाळेत ‘मुलींची सुरक्षा, जागृती आणि सावधानता’ या विषयावर ‘माहेर’ प्रतिष्ठानने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
माहेर प्रतिष्ठानच्या विद्या म्हात्रे, पोलीस हवालदार ज्योती नवले, बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, दीपाली थोरात, मानसी देशपांडे यांनी संयोजन केले.
