विराग क्रिकेट अॅकॅडमी, निंबाळकर स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या सामन्यात स्वर शिंदे याच्या कामगिरीच्या जोरावर विराग क्रिकेट अॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीचा ९ गडी राखून सहज पराभव केला आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीने १४२ धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान विराग क्रिकेट अॅकॅडमीने १७.२ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. स्वराज गायकवाड याने नाबाद ४५ धावांची, विराट उत्तेकर याने नाबाद ३४ धावांची तर, स्वर शिंदे याने ३५ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.
निंबाळकर स्पोर्ट्स संघाने फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीचा डीएलएस मेथडनुसार ३ गडी राखून पराभव करत स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीने १७७ धावा धावफलकावर लावल्या. सौरभ कांबळे (२६ धावा), श्रेयस वाघमारे (२३ धावा) आणि तनय खिंवसरा (२० धावा) यांनी संघाचा डाव सावरला. निंबाळकर स्पोर्ट्सचा डाव सुरू असताना पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे सामन्यामध्ये डीएलएस मेथडचा आवलंब करण्यात आला. यानुसार निंबाळकर संघाला २१ षटकात १२१ धावांचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले. हे आव्हान संघाने २०.२ षटकात व ७ गडी बाद गमावून पूर्ण केले. प्रणिल वर्टीकर (३२ धावा), राजवीर धामल (१८ धावा) आणि इशांत नरहरी (नाबाद १४ धावा) यांनी संघाचा विजय साकार केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीः ३० षटकात १० गडी बाद १४२ धावा (अमर कामत २६, आदर्श कोलार २४, आरूश पांडे २-१२) पराभूत वि. विराग क्रिकेट अॅकॅडमीः १७.२ षटकात १ गडी बाद १४३ धावा (स्वराज गायकवाड नाबाद ४५, विराट उषेकर नाबाद ३४, स्वर शिंदे ३५, भावेश शिरवी १-२२); सामनावीरः स्वर शिंदे;
फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीः ३० षटकात ९ गडी बाद १७७ धावा (सौरभ कांबळे २६, श्रेयस वाघमारे २३, तनय खिंवसरा २०, मोर्य पाटील २-२९, आयुष अमराळे २-२०, अभिराज सकपाळ २-२५) डीएलएस मेडथनुसार पराभूत वि. निंबाळकर स्पोर्ट्सः २०.२ षटकात ७ गडी बाद १२४ धावा (प्रणिल वर्टीकर ३२, राजवीर धामल १८, इशांत नरहरी नाबाद १४, आदिराज शिंदे ३-१९); सामनावीरः मौर्य पाटील;
