Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

बार्टी व लर्नेट स्किल्स लिमिटेड, दिल्ली यांच्यात झाला सामंजस्य करार

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकसीत करुन मागासवर्गीय युवकांना स्वतःचा विकास करता यावा नवनवीन उद्योग व नोकऱ्या मिळवता याव्यात यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) ने अतिशय महत्त्वाचा बार्टी आणि लॅर्नेट स्किल लिमटेड दिल्ली या देशभरातील आघाडीच्या संस्थेशी समाजस्य करार केला आहे .यामुळे मागासवर्गीय युवक आणि युवतीसाठी एक फार मोठी संधी निर्माण झाली आहे .
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शन ,सचिव सुमंत भांगे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या 1000 उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) आणि लर्नेट स्किल्स लिमिटेड, दिल्ली (स्कूलनेट इंडिया ची उपकंपनी तसेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) च्या भागीदारीत व देशातील सर्वात मोठी व्यावसायिक कौशल्य कंपनी) यांच्यामध्ये आज दिनांक १३/०७/२०२३ रोजी सामंजस्य करार करण्यात आला असून यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम सन 2023-24 या वर्षात राबविण्यात येणार आहेत.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे “ कुशल व्हा व नोकरी मिळवा ” या संकल्पनेतून नवीन पिढीतील युवक – युवतींसाठी रोजगार आणि उद्योजक करण्यासाठीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सदरील प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, औरंगाबाद व रायगड या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षणाचा लाभ अनुसूचित जातीच्या (SC) प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना घेता येईल. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा व वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणे अनिवार्य आहे. प्रशिक्षणार्थ्यांची निवड लर्नेट स्किल्स लिमिटेड, दिल्ली संस्थेकडून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे व तसेच प्रशिक्षणार्थ्यांची बौद्धिक आणि कौशल्य क्षमता तपासून केली जाईल.
बार्टी, पुणे व लर्नेट स्किल्स लिमिटेड, दिल्ली या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार यशस्वीरित्या पुर्ण झाला असून त्या अंतर्गत हायड्रोलिक आणि वायवीय फिटर, सीएनसी ऑपरेटर-टर्निंग, औद्योगिक वेल्डर, व्यावसायिक वाहन चालक आणि मूलभूत देखभाल आणि दुरुस्ती, सहाय्यक बांधकाम पेंटर आणि डेकोरेटर, सहाय्यक इलेक्ट्रीशियन, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर, अन्न आणि पेय सेवा- कारभारी, जनरल ड्युटी असिस्टंट, हेल्पर मा. प्लंबर जनरल, मेकॅट्रॉनिक्स, व्यवसाय विकास कार्यकारी, उद्योजकता विकास कार्यक्रम
इत्यादी २ ते ६ महिने कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम 1000 युवक – युवतींसाठी राबविण्याचे प्रस्तावित आहे.
सदर कौशल्य प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती ऑगस्ट 2023 पासून बार्टीच्या संकेत स्थळावर (https://barti.in/) उपलब्ध असेल. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी सदरील मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.

सामंजस्य करारासाठी बार्टीचे प्रतिनिधी म्हणून इंदिरा अस्वार, निबंधक, अनिल कारंडे, विभाग प्रमुख (प्रशिक्षण व कौशल्य),  वृशाली शिंदे, विभाग प्रमुख ((प्रशिक्षण व कौशल्य), महेश गवई, प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास विभाग), राहुल गित्ते, प्रकल्प अधिकारी (कौशल्य विकास विभाग) तसेच लर्नेट स्किल्स लिमिटेड, दिल्ली संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सुनील जोसेफ, (झोनल हेड, महाराष्ट्र) व ऋषिकेश शेडगे, (स्कीलिंग हेड, महाराष्ट्र), योगेश देसाई, (मोबिलायझेशन मॅनेजर) हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading