होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लाँच करत आहे स्पोर्टी
नवी दिल्ली – मोटो स्कूटरची परंपरा पुढे नेण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या स्कूटर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज आपल्या ग्राहकांसाठी नवी स्पोर्टी, आधुनिक आणि सोयीस्कर डिओ १२५ भारतात लाँच केली.
या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘२००२ मध्ये होंडा डिओ लाँच करून एचएमएसआयने मोटो- स्कूटर ही संकल्पना मांडली. मोटरसायकलचं आकर्षक रूप आणि स्कूटरचा सोयीस्करपणा एकत्रित करण्यात आलेली ही गाडी वेगाने देशातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक ठरली. याचं नवं रूप म्हणजेच होंडा डिओ १२५ तरुण ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. दमदार इंजिनबरोबरच डिओ १२५ मध्ये स्पोर्टी डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, होंडाची प्रसिद्ध स्मार्ट की यांचा समावेश करण्यात आला आहे. या गाडीचा सोयीस्करपणा ग्राहकांचे आयुष्य सोपे करणारा असून ते ही गाडी चालवण्याचा मनापासून आनंद घेतील.’
नवी डिओ १२५ सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘मर्यादा पार करून ग्राहकांचा रायडिंगचा अनुभव उंचावण्यावर एचएमएसआयचा भर असतो. नवा मापदंड तयार करण्यास सज्ज असलेल्या डिओ १२५ मध्ये स्पोर्टी डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीस्करपणा यांचा मेळ घालण्यात आला आहे. अनोखे स्टायलिंगच नव्हे, तर त्याबरोबर अत्याधुनिक वैशिष्ट्ये व कार्यक्षमता असलेला हा मास्टरपीस सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. डिओ १२५ वर स्वार होऊन नव्या, अभूतपूर्व प्रवासाचा अनुभव घेण्याचे आवाहन आम्ही रायडर्सना करत आहोत.’
स्पोर्टी डिझाइन
डिओ १२५ ला स्पोर्टी फ्रंट डिझाइन आकर्षक हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्पसह देण्यात आले आहे. यामुळे गाडीची एकंदर स्टाइल उंचावते. क्रोमसह देण्यात आलेला ड्युएल आउटलेट मफलर गाडीच्या स्पोर्टी लूकमध्ये भर घालतो आणि त्यामुळे अनोखी स्पोर्टी एक्झॉस्ट नोट तयार होते.
आधुनिक टे लॅम्पस नवे स्पिल्ट ग्रॅब रेल, वेव डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स, नवे ग्राफिक्स व नवीन ठळक लोगो यांमुले मोटो-स्कूटरचा स्पोर्टी लूक आणखी खुलला आहे.
आधुनिक तंत्रज्ञान
एच- स्मार्ट तंत्रज्ञानासह स्मार्ट की – स्पोर्टी डिओ १२५ स्मार्ट वैशिष्ट्यांना जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या होंडा स्मार्ट की ची जोड देण्यात आली असून त्याचबरोबर पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
- स्मार्ट फाइंड: स्मार्ट की मधील आन्सर बॅक यंत्रणेमुळे गाडी सहजपणे शोधता येते. होंडा स्मार्ट की वरील आन्सर बॅक बटन दाबल्यास त्यावरील ४ विंकर्स दोनदा ब्लिंक होतात व गाडी सहजपणे शोधता येते.
- स्मार्ट अनलॉक – यामुळे किल्लीशिवाय गाडी लॉक किंवा अनलॉक करता येते. जर अॅक्टिव्हेशननंतर २० सेकंद काहीच हालचाल झाली नाही, तर गाडी परत डिअॅक्टिव्हेट होते.
- स्मार्ट स्टार्ट – जर स्मार्ट की गाडीपासून दोन मीटर अंतरात असेल, तर रायडरला सीट आणि फ्युएल लॉक अनलॉक करता येते. लॉक मोडवरील नॉब (५ इन १ फंक्शन स्विच) फिरवून गाडी सहजपणे सुरू करता येते किंवा हाताळता येते.
- स्मार्ट सेफ: डिओ १२५ मध्ये स्मार्ट ईसीयू देण्यात आले आहे, जे ईसीयू आणि स्मार्ट की यांच्यातील इलेक्ट्रॉनिक सुरक्षा उपकरणासारखे काम करते. त्यामुळे वाहनाची चोरी होण्यास प्रतिबंध होतो. स्मार्ट की मध्ये इममोबिलायझर यंत्रणा आहे, जी नोंदणीकृत नसलेल्या किल्लीने इंजिन सुरू होण्यापासून रोखते. स्मार्ट की च्या सुरक्षित कनेक्शनशिवाय इममोबिलायझर यंत्रणा सुरू होत नाही.
डिओ १२५ मध्ये ओबीडी२ चे पालन करणारे होंडाचे विश्वासार्ह १२५ सीसी पीजीएम- एफआय इंजिन होंडा एफआय स्मार्ट एनहान्स्ड पॉवरसह (ईएसपी) देण्यात आले आहे. इंजिनच्या कामगिरीला चालना देणारे होंडाचे एनहान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञान कंबशनचा दर्जा सुधारते व सायलेंट स्टार्ट आणि पर्यावरणपूरक इंजिनच्या मदतीने घर्षण कमी करते. सायलेंट स्टार्ट आणि पर्यावरणपूरकता ही या इंजिनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये (ईएसपी) पुढील गोष्टींचा समावेश आहे –
– अनोखे होंडा एससीजी स्टार्टर – करंटनिर्मिती करण्यासाटी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एसी जनरेटरद्वारेच इंजिन झटक्याशिवाय सुरू होते. यामुळे नेहमीच्या स्टार्टर मोटरची गरज पडत नाही. यामुळे गियर मेशिंगचा आवाजही येत नाही.
– सुधारित टंबल फ्लो: होंडाने जगातील पहिले टंबल फ्लो तंत्रज्ञान इंटिग्रेटेड डाय- कास्टिंग प्रक्रियेतून तयार केले आहे. एनहान्स्ड स्मार्ट टंबल टेक्नोलॉजी (ईएसटीटी) इनलेट पोर्ट शेपचा पूर्ण वापर करते आणि रिव्हर्स फ्लो तंत्राच्या मदतीने कोणतेही अतिरिक्त घटक समाविष्ट न करता कंबशनची पातळी सुधारते व कमी इंधन वापरले जाते.
– प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय): इंजिनचा विशिष्ट डेटा आणि ६ बुद्धीमान सेन्सर्सकडून (इंजिन तेलाचे तापमान मोजणारे सेन्सर, इंजिनचा वेग मोजणारे सेन्सर, हवेचा दाब मोजणारे सेन्सर, हवेचे तापमान मोजणारे सेन्सर, थ्रॉटल पोझिशन सेन्सर) सतत मिळत असलेल्या फीडबॅकनुसार सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन भरले जाते. यामुळे उर्जेचा एकसलग पुरवठा केला जातो.
– कमी घर्षण आणि सुधारित कंबशन – ऑफसेट सिलेंडर, आटोपशीर वजनाचे क्रँकशाफ्ट आणि अचूक पिस्टन यामुळे इंजिनचे एकंदरीत घर्षण कमी होते. योग्य वजनामुळे इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. पिस्टन कूलिंग जेट प्रभावीपणे इंजिन थंड करते व इंजिनचे तापमान योग्य प्रमाणात राखून इंधन क्षमता सुधाते.
– सोलेनॉइड व्हॉल्व्ह – ऑटोमॅटिक चोक यंत्रणेप्रमाणे काम करून रिच एयर फ्युएल मिक्श्चरची खात्री करते आणि अगदी कोणत्याही वेळी एकाच प्रयत्नात स्टार्ट होते.
पूर्णपणे डिजिटल मीटर बुद्धीमान असून सर्व आधुनिक माहिती दर्शवतो. यामध्ये ३ रियल टाइम इनफॉरमॅटिक्स देण्यात आले आहेत. ते म्हणजे रेंज (टाकीत असलेल्या इंधनात किती अंतर पूर्ण करता येईल), सरासरी इंधन क्षमता (एकंदर इंधन कार्यक्षमता डिस्प्लेसाठी) आणि प्रत्यक्ष इंधन क्षमता, ज्यामुळे रायडिंग सुखकर होते. मीटरवर एकूण ट्रिप, घड्याळ, सर्व्हिस करण्याची सूचना देणारा इंडिकेटर देण्यात आला आहे. त्याशिवाय यात मलफंक्शन लाइट देण्यात आला आहे, जो गाडीत काही गंभीर बिघाड असल्यास रायडरचे लक्ष वेधतो.
डिओ १२५ मध्ये आयडलिंग स्टॉप सिस्टीम देण्यात आली आहे, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये आणि इतर छोट्या थांब्यावर इंजिन आपोआप बंद होते. यामुळे इंधनाचा अनावश्यक वापर टाळता येतो व उत्सर्जन कमी होते. थ्रॉटलला ट्विस्ट देऊन इंजिन सहजपणे परत सुरू करता येते, तर साइड स्टँड विथ इंजिन इनहिबिटरमुळे साइड स्टँड लावला असताना इंजिन सुरू होत नाही व सोयीस्कर आणि सुरक्षितपणे प्रवास करता येतो.
आरामदायी आणि सोयीस्कर
१२ इंची फ्रंट व्हीलसह देण्यात आलेल्या टेलिस्कोपिक सस्पेन्शनमुळे गाडीचे रूप जास्त उठावदार आणि स्टायलिश झाले असून त्यामुळे खडकाळ रस्त्यांवर सहजपणे वाट काढता येते. हाय ग्राउंड क्लियरन्समुळे (१७१ एमएम) अवघड रस्ते सहजपणे व आत्मविश्वासाने पार करता येतात.
डिओ १२५ वरील प्रत्येक राइड आरामदायी आणि सोयीस्कर करण्यासाठी यात कॉम्बी ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझर आणि ३ स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शन देण्यात आले आहे. यातील ड्युएल फंक्शन स्विच सीट अनलॉक करण्यासाठी तसेच एक्सटर्नल फ्युएल लिड उघडण्यासाठी वापरता येत असल्यामुळे रायडरची आणखी सोय होते. यामध्ये देण्यात आलेली अनोखी टु लिड फ्युएल ओपनिंग सिस्टीम रायडरसाठी जास्त सोयीस्कर व विश्वासार्ह ठरते.
१८ लीटरच्या स्टोअरेज जागेमुळे हेल्मेट ठेवून आणखी जागा स्टोअरेजसाठी वापरता येते. डिओ १२५ मध्ये फ्रंट पॉकेट्स देण्यात आले असून ते पटकन स्टोअरेज वापरता येते आणि रायडिंगमध्ये अडथळे येत नाहीत. इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विचमुळे एकाच स्विचवर सिग्नल पास करत हाय बीम/लो बीम सहजपणे नियंत्रित करता येते.
एच स्मार्ट व्हेरीएंटमध्ये लॉक मोड देण्यात असून हा एकच मोड प्रत्यक्ष किल्ली न वापरता (हँडल लॉक करणे, इग्निशन बंद करणे, फ्युएल लिड उघडणे, सीट उघडणे आणि इग्निशन सुरू करणे) अशी पाच कामे करतो.
ग्राहकासाठी नवे मूल्य
या क्षेत्रात पहिल्यांदाच एचएमएसआयने खास १० वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्षांची नेहमीची + ७ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) नव्या डिओ १२५ वर दिली आहे.
| व्हेरिएंट्स | स्टँडर्ड | स्मार्ट |
| किंमत (एक्स शोरूम दिल्ली) | ८३,४०० | ९१,३०० |
|
रंगाचे पर्याय |
पर्ल सायरन ब्लू, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, पर्ल नाइटस्टार ब्लॅक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट सांग्रिया रेड मेटॅलिक आणि स्पोर्ट्स
|
|
* केवळ स्मार्ट व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
