Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

सहाव्या स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेप्रसंगी तीन गुणवंत बुद्धिबळ पटुंचा सत्कार 

पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित सहाव्या स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेप्रसंगी 2023 या शैक्षणिक वर्षात मानांकित खेळाडू श्रावणी हरपुडे, धनश्री खैरमोडे आणि मिहीर सरवदे यांनी मिळवलेल्या प्राविण्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे माजी संचालक डॉ. सतीश ठिगळे आणि हर्षल लेले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, चीफ आरबीटर विनिता क्षोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये 2023मध्ये श्रावणी हलकुडेने नीट परिक्षेत 99.43% गुण मिळवले.,तर धनश्री खैरमोडेने दहावी परिक्षेत 83% गुण आणि मिहिर सरवदेने 12वी परिक्षेत 80 गुण मिळवले.
या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक, करंडक व रोख रकमेची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading