सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगतर्फे पंचशील रेसिंगची पहिली फ्रँचायझी टीम म्हणून घोषणा
पुणे : सीएट इंडियन सुपरक्रॉस लीगने पंचशील रेसिंगला त्याच्या उद्घाटन सत्रासाठी लीगची पहिली फ्रँचायझी टीम होण्याचा प्रतिष्ठेचा मान दिला आहे. पंचशील रियल्टीचे सन्माननीय अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली हे प्रतिष्ठेचे पद त्यांना मिळाले आहे. त्यांची खेळाप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेमच यातून अधिक दृढ झाले आहे. भारतातील सुपरक्रॉस रेसिंगचे मक्का म्हणून पुणे शहर प्रसिद्ध आहे. पुणे हेच या टीमचे घरचे स्थान असल्याने पंचशील रेसिंगच्या यशाला आणि आकांक्षांना भव्य रंगमंचावर साकारतानाचे पुणे शहर साक्षीदार असेल.
स्वत: माजी रेसर असलेले चोरडिया यांनी विविध राष्ट्रीय शर्यतींमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे आणि अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांचा अपार उत्साह आणि अतुलनीय पाठिंबा यामुळे ते या खेळाचा अमूल्य भाग बनले आहेत. पंचशील रियल्टीने बांधकाम व्यवसाय उद्योगात वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांच्या उल्लेखनीय पोर्टफोलिओसह एक जबरदस्त नावलौकिक मिळविला आहे. सॅटेलाइट टॉवर्सपासून निवासी संकुल, व्यवसाय केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर (ICC) पर्यंत पुण्याच्या लँडस्केपला नव्याने आकार देण्यात पंचशीलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांनी आता देशभरात पाऊल टाकले आहे.
यावेळी बोलताना, पंचशील रियल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया म्हणाले, “पंचशील रेसिंग च्या माध्यमातून सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये अग्रगण्य संघ म्हणून सामील होताना आम्हाला आनंद होत आहे. एक खेळाडू म्हणून माझा अनुभव आणि खेळाप्रती खोलवर रुजलेली उत्कटता यातून आम्ही भारतातील सुपरक्रॉसची अफाट क्षमता ओळखतो. सीएट आयएसआरएल
आम्हाला देशातील खेळाच्या विकासासाठी आमची बांधिलकी प्रदर्शित करण्यासाठी एक विलक्षण व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. खेळाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत पुणे स्थित आमच्या पूर्ण तयार सुपरक्रॉस रेस टीमचे अत्यंत व्यावसायिकतेने सक्षमपणे व्यवस्थापन केले जाईल. देशभरातील सुपरक्रॉस उत्साही लोकांना मोहित करेल अशी रोमांचक आणि उच्च-गुणवत्तेची रेसिंग देण्यास आम्ही बांधील आहोत. जागतिक सुपरक्रॉस कार्यक्रमात एक नवीन मापदंड प्रस्थापित करत असल्यामुळे मी आयएसआरएलला माझ्या शुभेच्छा देतो.”
या महत्त्वपूर्ण प्रसंगी बोलताना सुपरक्रॉस इंडिया प्रा. लिमिटेडचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे पहिले फ्रँचायझी मालक म्हणून चोरडिया आणि पंचशील रियल्टी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील एक सुप्रसिद्ध आणि आदरणीय नाव अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या मुळे लीगमध्ये मोलाची भर पडेल याची आम्हाला खात्री आहे. पंचशिल रेसिंग आणि लीग यांच्यातील सहयोग मोलाचा आहे. लीगचा दृष्टीकोन आणि ध्येयाशी ही टीम पूर्णपणे सुसंगत आहे. अतुल यांचा खेळातील समृद्ध अनुभव आणि ज्ञान संघाला आणि लीगला नवीन उंची गाठण्यात नक्कीच मदत करेल. वर्षानुवर्षे सुपरक्रॉससाठी असलेली चोरडिया यांची आवड आणि पाठबळ यामुळे अतुल चोरडिया हे उद्घाटक संघाचे मालक म्हणून लाभल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.”
एफएमएससीआयच्या सुपरक्रॉस रेसिंग कमिशनचे अध्यक्ष सुजीथ कुमार म्हणाले, “मला खात्री आहे की पंचशील रेसिंग ही येत्या काही वर्षांत मोठी शक्ती म्हणून गणली जाईल. अतुल चोरडिया यांच्या वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्वाखाली त्यांचा संघ सुपरक्रॉसच्या इतिहासात भारतातील खरे ट्रेलब्लेझर म्हणून आपले नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. चोरडिया यांच्या या खेळातील व्यापक सहभागामुळे त्यांचा एक वेगळा ठसाच उमटला आहे. इतकेच नाही तर इतर संघ आणि रायडर्सनाही त्यांचे अनुकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या खेळासाठी त्यांचा अतूट पाठिंबा पाहून मला खूप अभिमान वाटतो. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून होणाऱ्या उत्साहवर्धक कामगिरीची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) च्या सहकार्याने सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग एक अभूतपूर्व, जगातील पहिली फ्रँचायझी आधारित सुपरक्रॉस रेसिंग लीग असून ती जगभरातील रायडर्सना विविध फॉरमॅट आणि श्रेणी मध्ये स्पर्धा करण्यासाठी एकत्र आणते. रोमांचक, मनोरंजन, ग्लॅमर आणि तीव्र स्पर्धा एकत्र करत लीग देशातील मोटरस्पोर्ट्सच्या जगात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील भव्य अशा जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उद्घाटन सत्र सुरू होईल, त्यानंतर प्रमुख मेट्रो शहरांमध्ये रोमांचक कार्यक्रम होतील. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत, या शहरांमधील चाहते कौशल्य, धाडसी थरार आणि उच्च-गती कृतीचे चित्तथरारक प्रदर्शन पाहतील. यातून सुपरक्रॉस रेसिंगची पुर्नव्याख्या होईल.
