Monday, May 25, 2026
BusinessLatest News

 तनिष्कने ‘टेल्स ऑफ़ मिस्टिक’सह पॅरिस ओट् कुट्‌युअर् वीकमध्ये केले पदार्पण

पुणे :  भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य तनिष्कने दुर्मिळ व मौल्यवान हिरे आणि त्यांच्यासोबत रंगीबेरंगी जेमस्टोन्सचे एक खूपच अनोखे व शानदार कलेक्शन प्रस्तुत केले आहे – ‘टेल्स ऑफ मिस्टिक’, हे कलेक्शन राजस्थानातील महाल व शहरांच्या वास्तुकलेतील सौंदर्याने प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे. हे कलेक्शन लॉन्च करण्याबरोबरीनेच तनिष्कने पॅरिस ओट् कुट्‌युअर् वीक, फॉल-विंटर २०२३-२४ मध्ये आपल्या शानदार पदार्पणाची देखील घोषणा केली आहे. यासाठी तनिष्कने ख्यातनाम भारतीय डिझायनर राहुल मिश्रा यांच्यासोबत सहयोग केला आहे.

वास्तुकलेतील आश्चर्ये मानले जाणारे राजस्थानातील महाल आणि शहरांच्या वास्तुकलेतील बारकावे या कलेक्शनमधील प्रत्येक दागिन्यांमध्ये टिपण्यात आले आहेत. राजस्थानातील महालांची भव्यता व सौंदर्य यांचा आस्वाद घेत असताना ऐकल्या गेलेल्या कहाण्या एका युवा उत्साही प्रवाशाच्या नजरेतून पाहण्याचा अनुभव या कलेक्शनमध्ये घेता येतो. या उत्कृष्ट कलेक्शनच्या ६० क्रिएशन्समध्ये तनिष्कने यांची पुनर्कल्पना करून आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे.

या कलेक्शनमध्ये कारीगरांच्या कलात्मक अभिव्यक्तीचा सन्मान करण्यात आला आहे. कारागीर तांत्रिक कौशल्य आणि अद्भुत शिल्प कौशल्ये यांचा उत्कृष्ट मिलाप घडवून आणून कल्पना वास्तवात साकार करतात. दागिने व ओट् कुट्‌युअर् यांना एकत्र आणून, तनिष्क व राहुल मिश्रा यांनी एक असा ताळमेळ निर्माण केला आहे जो पारंपरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन भारतीय वारसा आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात प्रस्तुत करतो.

या भागीदारीविषयी तनिष्कच्या जनरल मॅनेजर – मार्केटिंग श्रीमती रंजनी कृष्णस्वामी यांनी सांगितले, “खूप ठिकाणांची सफर केलेल्या आणि आपल्या अनुभवांच्या खजिन्यामध्ये काही मौल्यवान जोडू पाहणाऱ्या पारखी व्यक्तींचे सर्वात आवडते ज्वेलर बनण्याच्या तनिष्कच्या प्रयत्नांमध्ये हे कलेक्शन एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘टेल्स ऑफ मिस्टिक’ आणि राहुल मिश्रा यांच्या ‘वी द पीपल’ या दोघांमध्ये देखील नाजूक शिल्प कौशल्ये व आधुनिक सिल्हट यांना एकत्र आणून भारतीय फॅशनची एक नवी व्याख्या रचली गेली आहे. आधुनिक भारतीय महिला व दागिन्यांची त्यांची आवड, चिक विंटेजविषयी त्यांना वाटणारा रस आणि कलेविषयीची त्यांची समज ही आमची प्रेरणा आहे.”

कलेक्शनबद्दल तनिष्कच्या हेड ऑफ डिझाईन, श्रीमती गरिमा माहेश्वरी यांनी सांगितले, “टेल्स ऑफ मिस्टिकमध्ये, तनिष्क उच्च दर्जाच्या दागिन्यांच्या एका नवीन रेन्जसोबत राजस्थानातील रंग, संस्कृती आणि सौंदर्य दर्शवत आहे. राजस्थानातील राजेशाही महाल, आकर्षक किल्ले आणि सुंदर शहरांच्या वास्तुकलेमध्ये लपलेल्या कहाण्या या कलेक्शनमध्ये सांगितल्या गेल्या आहेत.  हे कलेक्शन अद्भुत राजस्थानातील कलात्मक रंगांपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे आणि राजस्थानचे अद्वितीय वैशिष्ट्य मानले जाणारे शाही मोटिफ व अनेक बारकाव्यांचा समावेश असलेले विविध घटक यामध्ये आढळून येतात.

भव्य झरोखे, महिरपी, घुमट आणि पायऱ्या यांचे सौंदर्य दर्शवत, प्रत्येक दागिना तीन डायमेन्शन्समध्ये अतिशय मेहनतीने घडवण्यात आला आहे.  आधुनिक सिल्हट व रंगसंगतीचा उपयोग करून, गतकाळातील समृद्धीचे जतन करत एक मनमोहक कहाणी आपल्यासमोर मांडून वास्तुकलेतील सौंदर्य जिवंत केले आहे.

कलेक्शनमध्ये अद्वितीय डिझाईन घटक, १८ कॅरेट सोन्यामध्ये जडवलेले शानदार व फॅन्सी कट डायमंड्स यांच्यासह सेमीप्रेशियस स्टोन्स या कॉम्बिनेशनचा उपयोग करण्यात आला आहे.

आजच्या काळातील जाणकार, जागरूक महिलांची विकसित होत असलेली आवड, आपले व्यक्तिमत्व दर्शवतील असे स्टेटमेंट दागिने परिधान करण्याची त्यांची इच्छा डोळ्यासमोर ठेवून या कलेक्शनमध्ये उत्कृष्ट वास्तुकला आणि रचना यांचा सन्मान करण्यात आला आहे. हे कलेक्शन महिलांच्या जीवनशैलीला अनुरूप असावे यासाठी अतिशय विचारपूर्वक डिझाईन करण्यात आले आहे, त्यामुळे साडी, गाऊन आणि ड्रेसमध्ये देखील हे दागिने तितकेच खुलून दिसतात.”

तनिष्कसोबत भागीदारीविषयी राहुल मिश्रा यांनी सांगितले, “पॅरिसमध्ये ओट् कुट्‌युअर् वीकमध्ये आमच्या कुट्‌युअर् फॉल २०२३ शोकेससाठी एक ज्वेलरी पार्टनर म्हणून या सीझनमध्ये तनिष्कसोबत भागीदारी करायला मिळणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. भारतात आपल्या क्षेत्रातील एक सर्वात मोठा ब्रँड म्हणून तनिष्कने प्रस्थापित केलेल्या व्यापक सांस्कृतिक प्रभावाची मी प्रशंसा करतो. दागिने तयार करण्याचे त्यांचे कौशल्य आणि नैपुण्य, विशेषज्ञता, तसेच भारतातील स्थानिक कारीगरांना सक्षम बनवण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न अद्वितीय तर आहेतच, शिवाय ब्रँड राहुल मिश्राच्या मूलभूत विचारांच्या अनुरूप आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading