सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल
मुंबई : सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अधिकृत घोषणा केली. यावेळी पटेल म्हणाले की पुर्वीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व आमदार, मंत्री उपस्थित होते.
देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करत असल्याचं सुनिल तटकरे यांनी जाहीर केले. तर अमोल मिटकरी यांची पक्षाचे प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांनी नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले. या आधीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती ही हंगामी होती, त्यांना आता जबाबदारीतून मुक्त करण्यात येत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
