Monday, May 25, 2026
Latest NewsSports

ऑक्सफर्ड चषकाचे अनावरण करून ऑक्सफर्ड गोल्फ लीग ची दिमाखदार सुरुवात


पुणे :ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आयोजीत ऑक्सफर्ड गोल्फ लीग चे आज सकाळी ऑक्सफर्ड गोल्फ चषकाचे दिमाखदार अशा सोहळ्याने अनावरण करून सुरुवात झाली .या लीगचे उद्घाटन ऑक्सफर्ड क्लब चे अनिल सेवलेकर आणि एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी यांच्या हस्ते झाले सकाळी सात वाजता ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे झाले .यावेळी सर्व संघाचे प्रमुख खेळाडू उपस्थित होते .त्यानंतर प्रत्यक्ष गोल्फ लीग सामन्याला सुरुवात झाली .
आज सकाळी ऑक्सफर्ड गोल्फ प्रिमिअर लीगचा पहिला सामना अ गटातील द लीगशी क्लब विरुद्ध सुलतान ऑफ स्विंग असा झाला तर त्यानंतर ईगल फोर्सेस विरुद्ध विंग्स वॉरिअर्स अशी रंगतदार लढत झाली .
दुसऱ्या भागामध्ये ब गटातील एके ज पुना लायन्स विरुद्ध रोरिंग टायगर्स नागपूर असा सामना दुपारच्या सत्रात तर त्यानंतर शुब्बान सनरायजर्स विरुद्ध ग्रीन ग्लॅडिएटर्स अशी अतिशय चुरशीची लढत झाली .
आजच्या लढतीमध्ये इगल फोर्सेस ९ ,शुब्बान सनराइजेस ९,ऐस.जे. सुलतान ऑफ स्विंग ८.५ ,रोरिंग टायगर्स नागपूर ७, एके पुना लायन्स ५.५ , द लीजन्सी क्लब ५.५ ,विंग वॉरियर्स ४.५ ,ग्रीन ग्लॅडिएटर्स ४ असे गुण आज झालेल्या पहिल्या फेरीत गुण मिळाले .
या लीगमध्ये एका संघामध्ये पंधरा खेळाडू होते .आठ संघामध्ये एकूण १२० देशभरातील नामांकित खेळाडू सहभागी झाले होते .देशातील सर्वात नयनरम्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा ऑक्सफर्ड गोल्फ क्लब मध्ये ही स्पर्धा अतिशय उत्सहात सुरु झाली .ही लीग चार दिवस चालणार आहे ,१,२ व ८ आणि ९ जुलै रोजी अंतिम सामना पार पडणार आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading