Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसंतराव नाईक यांना अभिवादन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेली आहेत त्यात कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, स्वतंत्र महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. १ जुलै हा त्यांचा जयंतीदिन महाराष्ट्रात कृषिदिन म्हणूनही साजरा केला जातो.विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मा. अधिष्ठाता डॉ. विजय खरे, उप वित्त लेखाधिकारी शिवाजी अहिरे, उपकुलसचिव प्रदीप कोळी, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठूबे, डॉ. मयूर चोरडिया तसेच शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading