Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maharashtra rain update : पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्यातच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे हवामान विभाग प्रमुख के. एस. होसळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यानुसार आज (दि. 30 जून) पासून पुढील पाच दिवस राज्यात दमदार पावसाची शक्यता आहे. 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन स्पेलचा प्रभाव दक्षिण भारतातील भागात आणि संलग्न भागावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 जुलै पर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण जुलै महिना पाऊस असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading