Sunday, October 18, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Rain update : भारतात सर्वत्र जुलै महिन्यात पाऊस बरसणार

पुणे : भारतात मान्सून दाखल झाला तरी महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्यासाठी जून महिना उलटून गेला. जून महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेकरी चिंतेत असून पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. त्यातच पाऊस पडण्यास सुरूवात झाली असली तरी सलग पाऊस पडत नाही तोवर पेरण्या करू नका, असे राज्यसरकार कडून सांगण्यात आले आहे. मात्र आता पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर संपूर्ण जुलै महिना सरासरीच्या तुलनेत 94 ते 106 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख प्रमुख के. एस. होसळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता, त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागात आणि संलग्न भागावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर जुलै महिन्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे. यामध्ये मध्य भारत, दक्षिण व पूर्व भारत, ईशान्य व वायव्य भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच आग्नेय दक्षिण भागात सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळे कडून वर्तवण्यात आली आहे.

जून महिन्यात सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

यंदा मान्सून भारतात अपेक्षे पेक्षा उशिरा दाखल झाला. तसेच मान्सूनने भारतात सर्वदूर पोहोचण्यात देखील पूर्ण जून महिना घेतला. त्यामुळे संपूर्ण देशाचा विचार करता जून महिन्यात सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशी माहिती पुणे वेध शाळेकडून देण्यात आली आहे. देशात 1 जून ते 30 जूनमध्ये 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे सामान्याहून 10 टक्क्यांनी कमी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading