Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRA

दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची मदत

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्याने हत्या झालेले ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना एक लाख रुपयांचा निधी वार्ताहर संघाने वारिसे यांचे पुत्र कु. यश वारिसे यांना कायम ठेव रूपाने सुपूर्द करण्यात आला. वारिसे यांची हत्या झाल्याने वारिसे कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते.त्यांच्या मदतीसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने सदस्यांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला संघ सदस्यांनी चांगला प्रतिसाद देत प्रत्यक्ष आणि थेट १ लाख ३५ हजार रुपयांची मदत जमा केली. सदस्यांनी जमा केलेल्या मदतीतील संघाकडे जमा केलेल्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची कायम ठेव दिवंगत पत्रकार वारिसे यांचे वारस चिरंजीव यश वारिसे यांच्याकडे आडिवरे ( ता.राजापूर जि. रत्नागिरी) येथे आज बुधवार २१ जून २०२३ रोजी वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी संघाचे कार्यकारिणी सदस्य श्री. कमलाकर वाणी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. मंगेश चव्हाण उपस्थित होते. यानिमित्त कु. यश वारिसे यांस संघ पदाधिकाऱ्यांनी धीर देत वार्ताहर संघ आणि त्याच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वस्थ केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading