Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

साहित्य संस्था म्हणजे समाजाच्या रक्तवाहिन्या : डॉ. न. म. जोशी

पुणे : साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या समाजाच्या रक्त वाहिन्या आहेत, त्यांच्याद्वारे समाजातील व्यक्तींवर मूल्य संस्काराचे रक्ताभिसरण सुरु असते समाजातील क्षीण काढून शुद्ध रक्त पुरवठा करण्याचे काम केले जाते. आज सर्वत्र द्वेष दिसत आहे परंतु प्रेम कुठे दिसत नाही त्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. साहित्यांच्या प्रकाशाची बेटे आपल्यासमोर असल्याला हवीत तरच ज्ञान मिळू शकेल आणि त्यातून सुदृढ समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शिक्षण तज्ञ डॉ.न. म. जोशी यांनी केले.

धायरी येथील महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या वतीने “आषाढस्य प्रथम दिवसे” या कालीदास जयंती निमीत्त धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठाच्या सभागृहात सोमवार दिनांक १९ जून रोजी राष्ट्रीय स्तरावर मान्यवर सारस्वतांच्या उपस्थितीत कालिदास जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि गोवा राज्याचे माजी सभापती शंभूभाऊ बांदेकर, राष्ट्रीय काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. सू. द. वैद्य, संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी व्याख्याते वि. ग. सातपुते, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र ठाकुरदास, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते यांच्या अंभृणी, शब्दगंगा, अनुबंध, व सांजवेळा तसेच प्रा. डॉ. महेंद्र ठाकुरदास यांच्या त्रिपर्णी या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आजपर्यंत संस्थेने ६२ पुस्तकांचे प्रकाशन केले आहेत.

शंभूभाऊ बांदेकर म्हणाले, मानवाच्या भावना जागृत झाल्या तरच साहित्याची निर्मिती होऊ शकते, जो माणूस संवेदनशील नाही तो साहित्यक होऊ शकत नाही. साहित्यकार होण्यासाठी विविध साहित्य वाचले पाहिजे. लेखन करताना साहित्यिकांना समोर ठेवून साहित्य आकारले पाहिजे.

प्रथम सत्रातील सर्व मान्यवरांना महाकवी कालिदास लक्षणीय पुरस्कार नावाने पुण्याचे वैशिष्ठय असलेल्या मानाची पुणेरी पगडी, शाल, स्मृतिचिन्ह देवून सत्कारीत करण्यात आले. त्यामध्ये शंभूभाऊ बांदेकर गोवा, डॉ. छाया महाजन ( औरंगाबाद, संभाजी नगर ) डॉ. सना पंडित (नागपूर ), संजय बच्छाव ( गुजरात बडोदा ), डॉ. गिरीधर देशमुख ( अमरावती ), गणेश चौधरी ( टीव्ही चॅनेल ) डॉ. शोभा तेलंग ( इंदूर एम.पी.) , प्रा. डॉ. तुकाराम पाटिल, (चिंचवड ,पुणे ) डॉ. लक्ष्मण शिवणेकर.( भाईंदर, मुंबई ) यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading