Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

स्टेशनरी कटलरी असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर

पुणे : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा सचिन शामसुंदर मालपाणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट विक्रेता, उत्कष्ट महिला व्यापारी, कै.साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक २६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी सभागृहात हा समारंभ होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे, मदनसिंह रजपूत, सूर्यकांत पाठक, किशोर चांडक, अनिल प्रभुणे, नितीन पंडीत, सुरेश नेऊरगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती हे असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे यंदा २६ वे वर्ष आहे.

शिरीष बोधनी म्हणाले, दरवर्षी २५ मे या व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणा-या असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापा-यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यंदाच्या वर्षी उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार शनिवार चौकातील जीवन जनरल स्टोअर्स चे राजेंद्र सुगंधी, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार शनिवार मंडई रस्त्यावरील दीप इलेक्ट्रिकल्स च्या नेहा शहा, कै. साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार रंजीता होडे, फिनिक्स पुरस्कार सखी तुळशीबागचे गणेश रामलिंग आणि उत्कृष्ट दुकान पुरस्कार तुळशीबाग येथील श्री ज्वेलर्स चे चंद्रशेखर खोडके यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे.

दुकानातील स्वच्छता, सादरीकरण, आधुनिकता आणि ग्राहकांशी संबंध आदी गोष्टी पाहिल्या जातात. तसेच व्यापा-यांच्या उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थींची निवड समितीतर्फे केली जाते. यापूर्वी गिरीकंद ट्रॅव्हल्स चे विश्वास जोशी, गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला, दोराबजी अ‍ँड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फरशिद पटेल, कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे कृष्णचंद्रजी आर्य (करमचंदानी), लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर ट्रेडिंग कंपनीचे चकोर गांधी, जयराज ग्रुपचे राजेश शहा आदींना व्यापारभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading