राष्ट्राच्या आदर्शांचा अवमान सहन केला जाणार नाही-जगदिश मुळीक
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार ही आमची दैवत असून आमचा आदर्श आहेत त्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही कर्नाटक सरकार ने शालेय पाठयपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ केशव बळीराम हेडगेवार ह्यांचे धडे वगळून अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले आहे राहुल गांधी यांना खुश करण्याकरता जर हे सरकार राष्ट्रपुरुषांचा अपमान करत असेल तर ते भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी केले.
यावेळी बोलताना मुळीक पुढे म्हणाले की कर्नाटक सरकारच्या ह्या आदेशा विषयी शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे काय भूमिका मांडणार रोज सकाळी विविध वाहिन्यांवर आपले मत मांडणारे संजय राऊत हे ह्याविषयी काय भूमिका घेणार हे त्यांनी स्पष्ट करावे
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने कर्नाटक सरकार ने शालेय अभ्यासक्रमातून डॉ हेडगेवार व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धडे वगळण्यात आल्याबद्दल आंदोलन केले ह्यावेळी कर्नाटक सरकारचा तसेच राहुल गांधी सोनिया गांधी यांचा निषेध करण्यात आला
या वेळी शहराध्यक्ष मुळीक यांच्या सह सरचिटणीस गणेश घोष राजेश येनपुरे दीपक पोटे संदीप लोणकर कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे ह्यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
