Thursday, June 4, 2026
ENTERTAINMENTLatest NewsLIFESTYLE

या फॅशनेबल ट्रिक्‍ससह स्‍टाइलमध्‍ये पावसाळ्याचा आनंद घ्‍या!


पावसाळ्याचा आपल्‍या फॅशन निवडींवर परिणाम होऊ शकतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रॅक्टिकल राहण्‍यासाठी स्‍टाइलचा त्‍याग करावा. सर्वोत्तम फॅशन ट्रिक्‍ससह आकर्षक व फॅशनेबल दिसत पावसाळ्यात ओल्‍या रस्‍त्‍यांवर पावसाळ्याचा आनंद घेता येऊ शकतो. वॉटरप्रूफ फॅब्रिक्‍सपासून लेयरिंग टेक्निक्‍स निर्माण करण्‍यामध्‍ये एण्ड टीव्‍ही कलाकार स्टाइलमध्‍ये पावसाळ्याचा आनंद घेण्‍यासाठी काही फॅशन टीप्‍सबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), सपना सिकरवार (बिमलेश, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्‍तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’).

नेहा जोशी म्‍हणाल्‍या, ‘‘पावसाळ्यादरम्‍यान मी कॉटन व लिनेन यांसारख्या वजनाने हलके व आल्‍हाददायी फॅब्रिक्‍सना प्राधान्‍य देते. हे फॅब्रिक्‍स मला आरामदायी राहण्‍यास मदत करण्‍यासोबत पाऊस पडल्‍याने ओले झाल्‍यास त्‍वरित सुकतात. मी आर्द्रतेमुळे कॉटन शॉर्ट स्‍कर्ट, साड्या, कुर्ती, क्‍लासिक लिनेन किंवा कॉटन ट्राऊझर्स परिधान करते. या निवडींमधून स्‍टाइल दिसून येण्‍यासोबत पावसाळ्यामध्‍ये उपयुक्‍त देखील ठरतात. मी माझ्या मूडनुसार कॉम्‍फी शॉर्ट ड्रेसेसना प्राधान्‍य देण्‍यासोबत विविध स्‍टाइल्‍सचा देखील अवलंब करते. मी या पोशाखांसह स्‍कार्फ, दुपट्टा व वजनाने हलके आभूषणे देखील परिधान करते, ज्‍यामधून मला मान्‍सून लुक मिळतो. या स्‍टाइल्‍स आकर्षकतेची भर करण्‍यासोबत पावसामध्‍ये वापरण्‍यास अनुकूल आहेत. मी माझ्या कपड्यांवर चिखलाचे डाग दिसण्‍याबाबत काळजी म्‍हणून गडद रंगांचे पोशाख परिणान करते. हलक्‍या पेस्‍टल रंगांच्‍या कपड्यांवर पावसाळी चिखलाचे डाग दिसतात, ज्‍यामुळे या सीझनमध्‍ये त्‍यांचा वापर कमी केला जातो. तसेच, मी स्‍कार्फ परिधान करत पावसाच्‍या पाण्‍यापासून माझ्या लांब केसांचे संरक्षण करते. स्‍कार्फ केसांसाठी रक्षक म्‍हणून काम करण्‍यासोबत माझ्या एकूण लुकमध्‍ये स्‍टाइलची भर करतो.’’

सपना सिकरवार म्हणाल्या, ‘‘पावसाळ्यामध्‍ये टी-शर्ट व पॅण्‍ट्सच्‍या कॉम्‍बोच्‍या तुलनेत एथनिक कपडे परिधान करणे आव्‍हानात्‍मक असू शकते. पण एथनिक पोशाख आवडत असल्‍यामुळे मी पावसाळ्याला साजेसा असा माझा लुक सानुकूल करते. उदाहरणार्थ, मी कुर्तासह क्रॉप स्‍ट्रेट-फिट पॅण्‍ट्स किंवा ब्‍लॅक लेगिंग्‍स परिधान करते, जी पायाच्‍या घोट्यापर्यंत असते. गडद किंवा प्रखर रंग आणि काहीसे आरामदायी सिल्‍हूट माझ्या कुर्त्‍याला साजेसे असतात. स्‍टाइल कॅज्‍युअल ठेवत मी सर्वोत्तम फॅशनला प्राधान्‍य देते. तसेच मी पावसाळ्यदरम्‍यान चेहरा हायड्रेटेड ठेवते, ज्‍यासाठी मी हलका व पावडर-आधारित मेकअप करते. या सीझनमध्‍ये बाल्‍कनीमध्‍ये बसून गरमागरम कॉफीचा आस्‍वाद घेण्‍याची, तसेच आरामदायी पेहराव करण्‍याची संधी मिळते. यासाठी मी घरामध्‍ये वापरण्‍यास अनुकूल असे कॉटन कॉर्ड सेट्स किंवा कॉझी नाइट सूट्स आणले आहेत. हे समायोजन करत मी एथनिक वेअरचा आनंद घेऊ शकते, तसेच पावसाळ्यामध्‍ये व्‍यावहारिक व आरामदायी राहण्‍याची खात्री घेऊ शकते. तसेच फूटवेअरच्‍या संदर्भात पावसाळ्यामुळे तुमच्‍या आवडत्‍या शूजबाबत तडजोड करू नका. वॉटरप्रूफ बूट्स किंवा स्‍टायलिश रेन-फ्रेण्‍डली फूटवेअर खरेदी करा. विविध रंगांमधील क्‍लासिक रेन बूट्स किंवा वॉटरप्रूफ कोटिंग असलेले ट्रेण्‍डी अँकल बूट्स पायांना कोरडे ठेवू शकतात, तसेच एकूण लुकमध्‍ये फॅशनेबल स्‍टाइलची भर करू शकतात.’’ मालिका 

विदिशा श्रीवास्‍तव म्‍हणाल्‍या, ‘‘पावसाळी आऊटफिटचे नियोजन करता ओलाव्‍यामध्‍ये टिकून राहू शकतील अशा फॅब्रिक्‍सची निवड करा. सिल्‍क किंवा स्यूड सारखे साहित्‍य टाळा, ज्‍यांचे पावसाळ्यामध्‍ये नुकसान होऊ शकते. त्‍याऐवजी जलरोधक किंवा जलद सुकणारे फॅब्रिक्‍स जसे पॉलिस्‍टर, नायलॉन किंवा ट्रिटेड कॉटनचा वापर करता. हे फॅब्रिक्‍स तुम्‍हाला पावसाळ्यात आरामदायी व स्‍टायलिश ठेवतील. माझा आवडता ऋतू पावसाळ्यादरम्‍यान मला पावसात चालायला आवडते. हा सीझन पाहता मी व्‍यावहारिक, पण फॅशनेबल वेअरचा अवलंब करते, ज्‍यामध्‍ये क्रॉप पॅण्‍ट्स व क्रॉप टॉप्‍स, टी-शर्ट यांच्‍यासह कॉटन शर्ट, मिडी स्‍कर्टसह मॅच केलेले ट्यूब टॉप्‍स व वाइड-लेग ट्राऊझर्सचा समावेश असतो. स्‍कार्फ स्‍टायलिश आहे आणि पावसापासून माझ्या केसांचे संरक्षण करतो. पाऊस पडायला सुरूवात झाली की, मी त्‍वरित मान व डोक्‍याभोवती स्‍कार्फ गुंडाळते. पावसाळ्यामध्‍ये कधी-कधी उदासवाणे वातावरण असते, म्‍हणून आऊटफिटमध्‍ये आकर्षक रंगसंगतींची भर करत वातावरण उत्‍साहपूर्ण करा. उत्‍साही व लक्षवेधक लुक तयार करण्‍यासाठी आकर्षक रेनकोट, आकर्षक अॅक्‍सेसरीज किंवा आकर्षक छत्र्यांची निवड करा. यामुळे तुमचा मूड उत्‍साहित होण्‍यासह उदास वातावरणात फॅशन स्‍टेटमेंट देखील दाखवता येईल. म्‍हणून मी पावसाळ्यादरम्‍यान आवश्‍यक अॅक्‍सेसरी म्‍हणून आकर्षक छत्री सोबत ठेवते. मी मेकअपसाठी वॉटरप्रूफ उत्‍पादनांचा अवलंब करते, ज्‍यामध्‍ये सनस्क्रीन, वॉटरप्रूफ मस्‍करा किंवा आयलाइनर आणि लिप बाम यांचा समावेश असतो.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading