Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRA

उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोह संपन्न

यवतमाळ : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे आर्णि तालुका शाखे च्या वतीने तरोडा येथील उरूवेला बुद्धविहारात दि.5/6/23 पासुन दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रतिभाताई रामटेके केंद्रीय शिक्षिका यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले या शिबिराचा सांगता समारोह दि.14/6/23 ला सायंकाळी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिताताई मानकर होत्या प्रमुख मार्गदर्शक रवि भगत /उषाताई खंडारे- सुजाताताई घुटके यवतमाळ अलकाताई वाकोडे आर्णि तसेच नागोराव बनसोड अध्यक्ष आर्णि गौतम वाकोडे आर्णि-भिमराव मुजमुले जवळा -डोमाजी घुटके – आशिष रहाटे पोलीस पाटील तरोडा ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलानी व मुलीनी आपले मनोगत वेक्त केले. या कार्यक्रमाचे संचलन स्वेता अंबादास मनवर यांनी केले तर आभार अनुष्का नरेश मुनेश्वर यांनी केले शेवटी सरणतयं गाथेने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि उपस्थित सर्वांना रंजनाताई चहांदे यांच्या तर्फे भोजनदान देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading