महिंद्रा फायनॅन्सची आपल्या कर्ज सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी न्युक्लिअस सॉफ्टवेअरसोबत भागीदारी
मुंबई : महिंद्रा समूहाचा एक भाग आणि भारतातील आघाडीच्या गैरबँकिंग वित्त संस्थांपैकी एक (नॉन-बँकिंग फायनॅन्स कंपनी) महिंद्रा अँड महिंद्रा फायनॅन्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने (MMFSL) आज न्युक्लिअस सॉफ्टवेअरसोबत धोरणात्मक सर्वसमावेशक भागीदारीची घोषणा केली. न्युक्लिअस सॉफ्टवेअरचे प्रमुख उत्पादन ‘फिन्वन निओटीएम (FinnOne NeoTM) सोबतची ही टेकभागीदारी अजून विकासासाठी पाठीचा कणा मजबूत करण्यात मदत करेल. याच्या ‘प्लग अँड प्ले’ या वैशिष्ठ्यासह या उत्पादनामध्ये विविध फिनटेकच्या माध्यमातून भागीदार परिसंस्थांशी जोडण्याची तांत्रिक क्षमता आहे.
याव्यतिरिक्त, भागीदारी फिन्वन निओटीएम एलएमएस (FinnOne NeoTM LMS) आणि फिन्वन निओटीएम कलेक्शन्स (FinnOne NeoTM Collections) च्या क्षमतांचा लाभ घेत महिंद्रा फायनॅन्सच्या बॅक ऑफिस आणि ऑपरेशन्स टीमच्या कर्मचाऱ्यांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करते. शिवाय, फिन्वन निओटीएम सीएस (FinnOne NeoTM CAS) कर्ज निर्मितीच्या प्रवासाला सहाय्य करण्यासाठी मजबूत असे क्रेडिट बॅक बोन (CBB) प्रदान करेल. हे मॉडयूल्स महिंद्रा फायनॅन्समधील संपूर्ण व्यवसायाच्या परिसंस्थेमध्ये त्याच्या एपीआय (API) क्षमतांद्वारा एकत्रित केले जातील. न्युक्लिअस सॉफ्टवेअर ही एक सॉफ्टवेअर उत्पादन कंपनी आहे जी जागतिक वित्तीय सेवा उद्योग क्षेत्राला कर्ज आणि व्यवहार बँकिंग उत्पादने पुरविते.
महिंद्रा फायनॅन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी- नियुक्त, रॉल रेबेलो म्हणाले, “आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना निरंतर व गुंतवून ठेवणारा अनुभव मिळावा यासाठी आमचे सतत प्रयत्न चालू असतात. न्युक्लिअस सॉफ्टवेअरसोबत भागीदारी करताना आणि आमच्या कर्ज व्यवस्थापन व सेवा क्षमतांना अधिक बळकट करण्यासाठी आणि वाढ करण्यासाठी फिन्वन निओटीएम (FinnOne NeoTM) च्या कौशल्याचा लाभ घेताना आम्हाला आनंद होत आहे.”
न्युक्लिअस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग भिसे म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना वेग आणि कार्यक्षमता पुरविणाऱ्या लवचिक, विकसित होणारी आणि भविष्याच्या दृष्टीने बनविलेली प्रणालीसाठी पाया प्रदान करून व्यवसायाच्या धोरणांमध्ये व कामकाजामध्ये तंत्रज्ञान क्षमता संरेखित करून सक्षम बनवण्याचे ध्येय ठेवतो. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, महिंद्रा फायनॅन्सने फिन्वन निओटीएम (FinnOne NeoTM) च्या डिजिटल क्षमतांचे सामर्थ्य स्पष्टपणे प्रदर्शित करणाऱ्या सर्व्हिसेस फर्मच्यामाध्यमातून बीस्पोक सॉफ्टवेअर टायर करण्यासाठी आमच्या आयपी (IP) उत्पादनाची निवड केली आहे. ही भागीदारी धोरणात्मक नियोजन आणि रणनीती व स्वयंचलित कामकाजाला आकार देण्यासाठी सहयोगाचे उत्तम उदाहरण ठरेल.”
