Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षेच्या निकालांतील गोंधळ सुधारण्यासाठी अभाविप चे “मुक आंदोलन”

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिव्हॅल्यूएशन आणि बॅकलॉग च्या परीक्षांच्या विषयात झालेल्या गोंधळ सुधारून विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर च्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मुक आंदोलन” करून निदर्शने करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचा निकाल नापास म्हणून आला असता त्यांनी फोटोकॉपी साठी अर्ज केला. त्यावेळी, असे निदर्शनास आले की संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेतील कित्येक प्रश्न तपासण्यातच आले नव्हते त्यावर मार्किंग व्यवस्थित करण्यात आली नव्हते, परिणामी त्या विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा आला. विद्यार्थ्यांनी आपले पेपर फेर तपासणी साठी दिले असून २ महिने होऊन देखील त्यांचा निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासन अयशस्वी ठरले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या चाललेल्या या निष्काळजीपणाचा पूर्णपणे परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. या विषयावर विद्यापीठ प्रशासनाला अभाविप पुणे च्या शिष्टमंडळाकडून या आधीही चर्चा करून निवेदन देण्यात आले होते. पण तरी काही सकारात्मक परिणाम या विषयात झाला नाही. म्हणून आज दिनांक १४ जून ला अभाविप पुणे महानगर च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाने या विषयावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी “मूक आंदोलन” करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकांशी जेव्हा यावेळी चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले की, “ज्या विद्यार्थ्यांचा फेर तपासणी मध्ये निकाल पास येईल त्यांच्या मार्कशिट वर नव्याने पास चा शिक्का देण्यात येईल, तसेच ज्या विद्यार्थ्यांना फेर तपासणी मध्ये पास होण्याचा विश्वास आहे त्यांना बॅकलॉग च्या परीक्षा देण्याची गरज नाही, तसेच जे विद्यार्थी फेर तपासणी चा अर्ज देऊन बॅकलॉग च्या ही परीक्षा देतील त्यांना ज्या परीक्षेत अधिक गुण प्राप्त होतील ते गृहीत धरण्यात येतील, याचसोबत जे विद्यार्थी फेर तपासणी मध्ये पास होतील व ज्यांनी बॅकलॉग ची देखील फिस भरली असेल अश्या विद्यार्थ्यांची संबंधित फिस वापस करण्यात येईल.”अशीलेखी ग्वाही पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading