Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे ओबीडी२ 2023 युनिकॉर्न लाँच

नवी दिल्ली  – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज नवी, ओबीडी२ चे पालन करणारी  नवी 2023 युनिकॉर्न लाँच केली आहे.

ओबीडी२ सुसंगत नवी 2023 युनिकॉर्न लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक  त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘गेल्या दोन दशकांत भारतीय मोटरसायकलिस्ट्नी युनिकॉर्नला सातत्याने पसंती दिली आहे. हे लाँच ग्राहकांना ताकद, कार्यक्षमता, आरामदायीपणा तसेच उत्सर्जनाचे नियम पाळणारी गाडी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे दाखवते. ग्राहकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’

नवी ओबीडी२ सुसंगत 2023 युनिकॉर्न लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘होंडा युनिकॉर्नने आपली स्टाइल, डिझाइन, ताकद व आधुनिक रचना यांच्या मदतीने या क्षेत्रात सातत्याने ट्रेंड सेट केला आहे. ओबीडी२ सुसंगत पीजीएम- एफआय इंजिन त्याही पुढे जात अधिक चांगली कामगिरी करणारे ताकदवान इंजिन आहे. विशेष म्हणजे, नवी युनिकॉर्न पर्ल सायरन ब्लू रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना ही मोटरसायकल उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. होंडा युनिकॉर्नच्या माध्यमातून त्यांना अनोखा प्रवास करण्याची संधी मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

सफाईदार व कार्यक्षम इंजिन

होंडाच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे 2023 युनिकॉर्न नवी क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. 2023 युनिकॉर्नमध्ये बीएसव्हीआय ओबीडी२ चे पालन करणारे, होंडाचे मध्यम आकाराचे आधुनिक १६० सीसी पीजीएम- एफआय इंजिन बसवण्यात आले आहे, जे दर्जेदार कामगिरी करते.

हे आधुनिक आणि कार्यक्षम इंजिन चांगल्या प्रतीचा लो- एँड टॉर्क आणि उच्च इंधन कार्यक्षमता देण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले आहे. 10:1 च्या कॉम्प्रेशन रेशिओमुळे दर्जेदार कामगिरी होते. रॉकर आर्ममुळे सफाईदारपणे उर्जेचे वितरण होते व घर्षण कमी होते. या नव्या इंजिनमध्ये काउंटरवेट बॅलन्सर देण्यात आले आहे, जे कंपन कमी करते व कमी ते उच्च आरपीएममधले अक्सलरेशन अगदी सहजपणे होते.

आरामदायी आणि सोयीस्कर

नव्या 2023 युनिकॉर्न बीएसव्हीआयला एबीएसची (अँटी ब्रेक सिस्टीम) जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे रस्त्यावर असताना ब्रेकची कामगिरी जास्त चांगली होते. नव्या युनिकॉर्नमध्ये पुढे आणि मागे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. त्यामुळे पंक्चर झाल्यावरही लगेच हवा कमी होत नाही.

चांगली कामगिरी करणारे रियर मोनो शॉक सस्पेंशन सीटखाली बसवण्यात आले असून आधुनिक, दमदार व लवचिक डायमंड फ्रेममध्ये बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गाडी चालवण्याचा आरामदायीपणा वाढतो आणि जास्त स्थैर्य मिळते. उच्च ग्राउंड क्लियरन्स (१८ एमएम) आणि लांब व्हीलबेसमुळे (१३३५ एमएम) लांब पल्ल्याचा प्रवासही आरामात करता येतो. २०२३ युनिकॉर्न इंजिन स्टॉप स्विच देण्यात आल्यामुळे छोट्या थांब्यांवर फक्त एका बटनाच्या मदतीने इंजिन बंद करता येते.

अभिजात आणि प्रीमियम स्टाइल

विस्तृत फ्रंट काउल, स्मोक्ड स्क्रीन, प्रशस्त टँक यामुळे गाडी दणकट दिसते. साइड कव्हरवरील क्रोम स्ट्रोक, फ्रंट काउलवर क्रोम गार्निश आणि इंधनाच्या टाकीवर थ्रीडी होंडा विंग मार्क यांमुळे मोटरसायकलीच्या रूपात आणखी भर पडली आहे. सिग्नेचर टेल लॅम्प डिझाइन आणि ब्लू बॅकलिट मीटर कन्सोलमुळे गाडीचे रूप आणखी देखणे दिसते.

ग्राहकासाठी पूर्ण मूल्य आणि विश्वासार्हता

या क्षेत्रात पहिल्यांदाच एचएमएसआयद्वारे 2023 युनिकॉर्नवर दहा वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज (नेहमीची ३ वर्ष + ७ पर्यायी विस्तृत वॉरंटी) देण्यात येत आहे.

2023 युनिर्न चार रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे – पर्ल इग्नियस ब्लॅक, इम्पेरियल रेड मेटॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू. नव्या 2023 युनिकॉर्नची किंमत रू १,०९,८०० पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली) होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading