Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

एएसजी आय हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांची नेत्र तपासणी

पुणे – जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होताच फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एएसजी आय हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांसाठी नेत्र तपासणी करण्यात आली. पालखी पुणे मुक्कामाच्या दिवशीहि हे तपासणी शिबीर असणार आहे. आतापर्यंत जवळपास ८५० वारकऱ्यांनी या नेत्र तपासणीचा लाभ घेतला आहे. डॉ. नितेश साळुंखे, डॉ. हेमंत कांबळे, डॉ. पियुष जैन, डॉ. आकाश यादव, डॉ. अनुप सदाफळे, डॉ. सुदीप पुजारी अशा निष्णात नेत्रतज्ज्ञांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा केली. याचबरोबर झोनल मॅनेजर रामेश्वर इंगळे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
हॉस्पिटलतर्फे अनेक सामाजिक कामे केली जातात याचाच एक भाग म्हणून या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत नेत्र तपासणीबरोबरच आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading