युनायटेड इलेव्हन, आयोध्या वॉरीयर्स संघांचे विजय !!
तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा
चिन्मय बीडकर याच्या ७६ धावांच्या जोरावर आयोध्या वॉरीयर्स संघाने डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबचा ६८ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना आयोध्या वॉरीयर्सने २० षटकामध्ये १९१ धावा चोपल्या. चिन्मय बीडकर याने ५२ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ७६ धावांची खेळी केली. त्याला रोहीत रनावरे (२२ धावा) आणि कर्णधार गिरीष ओक (नाबाद २४ धावा) यांनी सुरेख साथ दिली. या आव्हानासमोर डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबचा डाव १२३ धावांवर मर्यादित राहीला. आयोध्या वॉरीयर्सचे गोलंदाज प्रविण कुतवड (४-१६) आणि गिरीष ओक (२-१६) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
युनायटेड इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १७० धावा (भावेश पाटील ६७ (४७, १० चौकार, १ षटकार), राहूल संग्राम ५१ (३८, ७ चौकार, २ षटकार), सुखबीर सिंग ४-३०);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी भावेश आणि राहूल यांच्यात ९० (६२) वि.वि. एकदंत क्रिकेट क्लबः १८.३ षटकात १० गडी बाद १३४ धावा (अमोल लहासे ३७, सुदर्शन गुणे २१, शंतनु प्रसादे ३-१५, विजय शिंदे ३-२७, धीरज शेट्टी २-१५); सामनावीरः भावेश पाटील;
आयोध्या वॉरीयर्सः २० षटकात ७ गडी बाद १९१ धावा (चिन्मय बीडकर ७६ (५२, ९ चौकार, १ षटकार), रोहीत रनावरे २२, गिरीष ओक नाबाद २४, अनिकेत कुलकर्णी ३-३१) वि.वि. डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबः १८.२ षटकात १० गडी बाद १२३ धावा (अमीत द्रविड ३३, अनिकेत कुलकर्णी २८, प्रविण कुतवड ४-१६, गिरीष ओक २-१६); सामनावीरः चिन्मय बीडकर;
