‘कळसूबाई’ सह १५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह स्वराज्यगुढी
शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग, तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, राजमाची, विसापूर, इंदुरी, मोरगिरी, कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळगड,भुदरगड, सामानगड, भैरवगड, जीवधन, वसंतगड या किल्ल्यासह १५१ गडांवर हा सोहळा साजरा झाला. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, तुळशीबाग मंडळ, शनी मारुती बाल गणेश मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ यासह पुण्यातील १५१ मंडळांनी हा सोहळा साजरा केला.
अमित गायकवाड म्हणाले, ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षात महाराष्ट्रातील सर्व शिखरांवर ६ जून हा शिवस्वराज्य दिन शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून साजरा करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील महत्वांच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळां मध्ये जागृती करुन त्यांचाही सहभाग या सोहळ्यामध्ये वाढवुन खऱ्या अर्थाने शिवरायांना सार्वजनिक रित्या व्यापक मानंवदना दिली जात आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कंक, सागर पवार, गणेश जाधव, अशोक सरपाटील, सचिन पवार, नितीन पंडित, चंद्रकांत गायकवाड यासह असंख्य स्वराज बांधवांनी केले.
