महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे 269 व्या महिलेची जटेतून मुक्तता…..
पुणे : शहरातील नांदेड सिटीमध्ये राहणार्या कांताबाई पाटील या ताईच्या डोक्यात गेली 12 वर्षापासून साधरण 3 kg वजनाची जट तयार झाली होती. त्यामुळे त्यांना शारिरिक, मानसिक त्रास होत होता पण मनात देवाची भिती असल्यामुळे जट कापल्यानतर काही तरी अनर्थ घडेल अशी मनात भिती असल्यामुळे त्या जट कापण्यास तयार नव्हत्या.
गेली 10/12 वर्षे घरातले लोक जट काढण्यास विनंती करत होते पण त्या कोणाचे ऐकण्यास तयार नव्हत्या. त्यांच्यां मुलाने महा.अंनिस नंदिनी जाधव(राज्य कार्यकारिणी सदस्य) यांना विनंती केली आईचे समुपदेशन करून त्याच्या डोक्यातील जट काढण्यास मदत करण्याची विनंती केली. तेव्हा अनिल वेल्हाळ( पुणे शहर कार्याध्यक्ष ) डॉ.नितीन हांडे या सर्वाना सोबत घेवून नांदेड सिटी येथे पाटील यांचे घरी जावून घरातील सर्वाचे समुपदेशन केले. जटेबाबत असणाऱ्या शंकाचे निरसन केले. आधी केलेल्या जट निर्मूलनाचे फोटो, व्हिडीओ दाखवले. ताईच्या मनातील भिती दूर करून त्यांच्या संमतीने 12 वर्षे डोक्यावर असले जटेचे ओझे उतरवण्यात महा. अंनिसला यश आले.
